Headlines

भारतीय क्रिकेटर Prithvi Shaw ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल

[ad_1]

Prithvi Shaw Attacked : मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) सेल्फी (Selfie) घेण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला. दरम्यान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. यावेळी या महिलेने पृथ्वीला मारहाण केल्याचं दिसून येतंय. यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.

पृथ्वी शॉ आणि त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचे 2 व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यामधील एका व्हिडीओमध्ये या महिला चाहतीसोबत असलेल्या तिच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी शॉ आणि त्यांच्या मित्रांनी आम्हाला मारलं. तर दुसऱ्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातलेल्या महिलेसोबत बाचाबाची झाल्याचं दिसून येतंय. 

नेमकं प्रकरणं काय?

मिळालेल्या माहितनुसार, पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरला. मात्र यावेळी पृथ्वीने नकार दिला. 

यानंतर सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनी पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला. याशिवाय या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केलाय.

पृथ्वी शॉची ती पोस्ट चर्चेत

पृथ्वी शॉत क्रिकेटबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत असतो. नुकतंच वेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर तो गर्लफ्रेंड निधी तापडिया (Nidhi Tapadia)सोबत लग्नबंधनात अडकल्याची बातमी समोर आली. स्वत: पृथ्वी शॉ आणि निधी तापडियाचा एक फोटो समोर आल्यानंतर ही चर्चा सुरु झाली. पृथ्वी आणि निधी तपाडियाचा एकमेकांना किस करतानाचा फोटो आहे.या फोटोच्या कॅप्शनला ‘हॅप्पी वॅलेंटाईन माय वाईफ’ असे कॅप्शनला लिहिण्यात आले आहेत. यासोबत ही स्टोरी निधीला टॅग करण्यात आली आहे. ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर काही मिनिटांनी ती डिलीट देखील करण्यात आली होती. 

पृथ्वी शॉची क्रिकेट कारकिर्द

पृथ्वी शॉ भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 1 T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. कसोटी सामन्यांच्या 9 डावात त्याने 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या. पृथ्वीच्या नावावर एकमेक T20 सामना असून, यात त्याने फक्त एक चेंडू खेळला, ज्यामध्ये तो खाते उघडू शकला नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *