Headlines

IND vs NZ : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे करोडो क्रिकेट फॅन्सची निराशा झाली होती. आता क्रिकेट फॅन्सना 20 नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्याची उत्सुकता लागली आहे. मात्र हा दुसरा सामना देखील रद्द होण्याची शक्यता आहे.  

हे ही वाचा : फिफा वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बूट का दिला जातो? जाणून घ्या 

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) आज पहिला टी20 सामना खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे तो रद्द करण्य़ात आला होता.आज वेलिंग्टनमध्ये एवढा पाऊस पडला की या सामन्याचे नाणेफेकही होऊ शकले नाही. त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होता. 

आता या मालिकेतील दुसरा टी-20 सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हलवर 20 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हवामान खात्याच्या (weather report) म्हणण्यानुसार या सामन्यादरम्यानही पाऊस 
पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याचा अंदाज काय? 

Accuweather च्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी माउंट मौनगानुईमध्ये दिवसभर पाऊस पडू शकतो. या दिवशी पाऊस पडण्याची 84 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत दुसरा टी20 सामनाही पावसामुळे रद्द होऊ शकतो. माउंट मौनगानुई येथे शनिवारीही हवामान खराब राहू शकते, अशा परिस्थितीत दोन्ही संघांचे खेळाडू सरावापासून दूर राहू शकतात.

हवामान खात्याने (weather report) दुसऱ्या टी-20 सामन्याबाबत असेही म्हटले आहे की, त्या दिवशीही पाऊस जोरदार होऊ शकतो.असे झाल्यास दोन्ही संघांमधील दुसरा टी20 सामनाही रद्द होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट फॅन्सची पुन्हा एकदा निराशा होण्याची शक्यता आहे.  

दरम्यान भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे खेळवला जाणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *