Headlines

IND VS ENG : टीम इंडियाची खिल्ली उडवताना पाकिस्तानचे पंतप्रधानचं झाले ट्रोल

[ad_1]

पर्थ : टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल (Semi final) सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाला आहे. इंग्लंडने 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानकडून टीम इंडियाची खिल्ली उडवली जात आहे. त्यात आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahwaz Sharif) यांनी भारतावर निशाणा साधला आहे. हा निशाना साधताना आता तेच ट्रोल होऊ लागले आहे.  
 
टीम इंडियाच्या पराभवानंतर आता त्यांच्यावर चहूबाजूने टीका होऊ लागली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahwaz Sharif) यांनी देखील भारतावर टीका केली आहे. पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर शाहबाज यांनी ट्विट करत टीम इंडियाच्या पराभवाचा उल्लेख केला आहे. 

काय ट्विट केले आहे? 

शाहबाज शरीफ (Shahwaz Sharif) यांनी ट्विटमध्ये रविवारी इंग्लंड आणि पाकिस्तानची फायनल होणार याचा उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानच्या सेमीफायनल मॅचचा स्कोअर आणि इंग्लंडचा स्कोरही नमूद केला आहे, ज्यामध्ये दोन्ही टीम्सने सेमीफायनलमध्ये 10 गडी राखून पराभूत केले होते. 

शाहबाज शरीफ (Shahwaz Sharif) सध्या इंग्लंडमध्ये आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटण्यासाठी ते लंडनला पोहोचले आहेत. लंडनमध्ये बसून त्यांनी ट्विट केले की, या रविवारी 152/0 आणि 170/0 म्हणजेच T20 विश्वचषक पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय फॅन्सकडून ट्रोल 

शाहबाज शरीफ (Shahwaz Sharif) यांच्या या ट्विटनंतर आता भारतीय क्रिकेट फॅन्सकडून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. अनेक जणांनी त्यांना बाबर आझमच्या टीमच्या आकड्यांची आठवण करून दिली. तर अनेकजण,  तुम्ही पाकिस्तान किंवा इंग्लंड कोणाचे समर्थन कराल कारण तुमचे पैसे फक्त इंग्लंडमध्ये गुंतवले जातात, असे प्रश्न विचारत आहेत. 

तसेच अनेक य़ुझरनी ट्रोल करताना लिहले की, तुम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान आहात की पंतप्रधान कॉमेडियन? तर त्याचवेळी एका यूझरने पाकिस्तानला 1971 च्या युद्धाची आठवण करून दिली आणि तुमचा स्कोअर 93000/0 असल्याचे सांगितले. त्याच्या ट्विटवर फक्त भारतीय यूजर्सच त्यांना ट्रोल करत नाही आहेत तर पाकिस्तानातील लोकांनीही त्यांना ट्रोल केले आहे.

दरम्यान आता टीम इंडियाच्या (Team India) पराभवानंतर इंग्लंड फायनलमध्ये पोहोचली आहे. आता फायनल लढत इंग्लंड विरूद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *