Headlines

IND vs AUS: नागपूरच्या मैदानात Mohammed Shami नावाचं तुफान; विराट कोहलीलाही टाकलं मागे

[ad_1]

Mohammed Shami : भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या 4 सामन्यांच्या टेस्ट सिरीजच्या पहिल्या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. नागपूरच्या पीचवर उत्तम गोलंदाजी करत त्याने कांगारूंच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. मात्र गोलंदाजी सोबत फलंदाजीमध्येही त्याने चार चांद लावते. पहिल्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 37 रन्सची खेळी केली. 

मोहम्मद शमीच्या या खेळीमध्ये 3 सिक्सचा देखील समावेश आहे. शमीने त्याच्या या खेळीच्या जोरावर विराट कोहलीला देखील मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मारलेल्या 3 सिक्सच्या मदतीने 85 डावांमध्ये एकूण 25 सिक्स मारले आहेत. याशिवाय 2 हाफ सेंच्युरीसह शमीने 722 रन्स केले आहेत. दुसरीकडे  विराट कोहलीने टेस्टमध्ये 178 डावांमध्ये 24 सिक्स मारले आहेत. त्यामुळे या बाबतीत शमीने विराट कोहलीला पछाडलंय. 

Mohammed Shami ने या भारतीय खेळाडूंना टाकलं मागे

शमीने फलंदाजी करत 37 रन्सचं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. त्याच्या या खेळीमध्ये 3 सिक्सचा समावेश होता. यासोबतच या शमीने आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड नोंदवला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो सामील झालाय.

शमीने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजारा, केएल राहुल आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांना मागे टाकलंय. शमीने कसोटी क्रिकेटमध्ये 25 सिक्स ठोकले आहेत. तर पुजारा (15) आणि कोहली (24) आणि केएल राहुल (17) यांच्या नावावर सिक्सची नोंद आहे. 

टेस्टमध्ये सिक्स मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे

टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर कर्णधार रोहित शर्माचे नाव या यादीत पहिलं आहे. ज्याने 66 सिक्स मारलेत. या बाबतीत त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकलंय. त्याच्या नावावर फक्त 64 सिक्स आहेत. 

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. तर दुसऱ्या क्रमांकावर महेंद्रसिंग छोनी आहे. यानंतर सचिन 69 सिक्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाचा मोठा विजय 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावातच संपुष्टात आला. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली.  रवींद्र जडेजा, आर अश्विन  यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरला. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *