Headlines

Hindu Rituals About Coconut : पूजेत स्त्रीया नारळ का फोडत नाही, जाणून घ्या कारण

[ad_1]

मुंबई : आपल्या घरात किंवा कार्यालयात कोणतंही शुभ कार्य होत असेल तर त्यावेळी नारळाचे (coconut) विशेष महत्त्व असते. शास्त्रात स्त्रियांना काही काम करण्यास मनाई आहे, त्यातील एक म्हणजे नारळ फोडणं, जे स्त्रियांना वर्जित आहे. नारळ अत्यंत पवित्र मानलं जातं. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही त्रिमूर्तींचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. नारळातील तीन डोळे हे शिवाच्या त्रिनेत्राचे रूप मानले जाते.(hindu religion) 

शास्त्रात नारळ फोडणं हे एक प्रकारचं त्यागाचं बळीच प्रतिक मानलं जातं. स्त्रियांनी नारळ न फोडण्यामागचं कारण म्हणजे नारळ हे एक बी आहे आणि स्त्री एका बाळाला जन्म देते. असे म्हटले जाते की जर एखाद्या महिलेनं नारळ फोडलं तर तिच्या गर्भाशयावर नकारात्मक परिणाम होतो. (why women do not break coconut)  

भगवान विष्णूनं लक्ष्मीजींसोबत नारळही पृथ्वीवर फळ म्हणून पाठवले. यावर फक्त मां लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच महिलांना नारळ फोडण्यास मनाई आहे. प्रत्येक शुभ कार्यात नारळ फोडण्यामागे एक श्रद्धा आहे की ते फुटल्यावर सर्वत्र पाणी पसरते ज्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. नारळाचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते.

हेही वाचा : Dipika च्या नणंदेला लग्नाच्या काही दिवसानंतरच होऊ लागला पश्चाताप, Video शेअर करत म्हणाली…

सर्व नारळांच्या तुलनेत एकाक्षी नारळाला विशेष महत्त्व आहे, ते माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे म्हटले जाते की ज्याच्याकडे एकाक्षी नारळ आहे त्याला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. (hindu religion ritual why women do not break coconut know reason) 

असे म्हटले जाते की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारळाचे झाड आणि कामधेनू पृथ्वीवर आणले. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. असे मानले जाते की देवाला नारळ अर्पण केल्याने दुःख आणि वेदना नष्ट होतात. पूजेत कलशाच्या वर नारळ ठेवला जातो, ते गणेशाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. (women do not break coconut)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *