Headlines

Hanuman Ji Worship Time : हनुमानाची ‘या’ वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!

[ad_1]

Mangalwar Hanuman Ji Puja :  हिंदू संस्कृतीनुसार, कोणत्याही देवतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, त्यांची योग पद्धतीने पूजा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी योग्य वेळी हनुमानाची पूजा केल्यास तो लवकर प्रसन्न होतो. भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दु:ख, भीती आणि त्रास दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळचा प्रभाव कमी आहे, त्यांनी मंगळ दोषापासून मुक्ती मिळण्याबरोबरच संकटमोचनाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी  काळजी घेण्याची गरज आहे. जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मंगळवार दिवशी पूजेची वेळ

ज्योतिष शास्त्रानुसार योग्य वेळी हनुमान यांची पूजा केल्यास चमत्कार लवकर दिसून येतात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. सकाळी किंवा संध्याकाळी हनुमानजीची पूजा केल्यास हनुमानजी लवकर प्रसन्न होतात.

 पूजा करण्याची योग्य पद्धत

– हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी मंगळवारी सकाळी स्नान झाल्यानंतर लाल रंगाचे कपडे परिधान करा. शक्य असल्यास लाल रंगाचे कापड असे हवे की, ते शिवलेले नसावे.

– तसेच घरात बनवलेले पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे. घराच्या ईशान्य कोपर्‍यात एक चौकी बसवा आणि त्यावर लाल रंगाचे कापड पसरवा. त्यानंतर हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. तसेच प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास विसरु नका.

त्यानंतर हनुमानाच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा आणि हनुमान पठण करा. मग रामाची प्रार्थना करा. हनुमानाला लाल रंगाची फुले आणि सिंदूर अर्पण करा.

हा खास उपाय करा

– ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा. तसेच सुंदरकांड पठण केल्याने शनीच्या सती आणि धैय्यापासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानाची पूजा अत्यंत लाभदायी मानली जाते.

– हनुमान याच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगल दोष असेल आणि मंगल बळकट करायचे असेल तर हनुमान चालीसा पाठण करा आणि वानरांना हरभरे खाऊ घाला. ते तुमच्यासाठी शुभ असून चांगले फळ मिळते.

– मंगळवार या दिवशी व्रत ठेवल्याने मान-सम्मान मिळतो. तुमच्याबद्दल आदर वाढतो. या दिवशी हनुमानजींची विधिवत पूजा केल्याने भक्तांची सर्व संकट दूर होतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *