Headlines

‘हमार फगुनिया’, Vanita Kharat चा पतीसोबतचा देसी रोमँटिक व्हिडीओ VIRAL

[ad_1]

Vanita Kharat And Husband Sumit Video : ‘महाराष्ट्र हास्यजत्रा’ फेम वनिता खरात (Vanita Kharat) ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी वनितानं तिचं बॉलिवूडमध्ये आणि त्यात सुद्धा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला म्हणून चर्चेत आली होती. वनिता खरात सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच वनितानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिला आणि तिच्या पतीला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंतर ते ‘मांझी- द माऊंटन मॅन’ (Manjhi – The Mountain Man) या चित्रपटातील एका सीनवर अभिनय करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

वनितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वनिता आणि तिचा पती सुमित दिसत आहे. या व्हिडीओत वनिता मांझी चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहे. ‘ तु हमरा जान है रे फगुनिया, तोहर को इतना चाहते हैं, इतना चाहते हैं, इतना चाहते हैं, इतना चाहते हैं, इतना चाहते हैं; कितना चाहते हैं का बताते हैं; सीना चीयर के दिखायें बजरंगबली जैसा?’ या डायलॉगवर वनिता अभिनय करताना दिसत आहे. तर वनिता अचानक सुमितची कॉलर पकडते आणि त्यानंतर त्याला किस करत हे डायलॉग बोलत असते. यावेळी वनिता असं काही करत असताना सुमितच्या चेहऱ्यावर असणाऱ्या एक्सप्रेशनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत वनितानं कॅप्शन दिलं की ‘हमार फगुनिया’ त्यासोबत वनितानं हसायचे कॅप्शन दिलं आहे. 

वनिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, युअर फुगिना इज क्यूट. दुसरा नेटकरी म्हणाला, परदापण. यावेळी नेटकरी वनिता आणि सुमीतच्या मागे असलेल्या परद्याविषयी बोलत आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, Controversy होण्यासाठी सर्व काही सुरु असतं. आणखी एक नेटकरी म्हणाला, वने येडे येडे. दरम्यान, वनिता आणि सुमीतच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अशा विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. 

हेही वाचा : Amitabh Bachchan यांची नात आराध्या प्रकरणी हायकोर्टाचे Youtube ला आदेश

वनितानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. वनितानं रोहित शेट्टी निर्मिती असलेल्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटातही काम केलं आहे. त्याशिवाय वनिताला अनेक हिंदी चाहते तिच्या कबिर सिंग या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखतात. यासोबतच वनितानं वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *