Headlines

हिरव्यागार ब्रोकोलीचे चिक्कार फायदे, फ्रीजमध्ये पडून आहे? ताबडतोब बाहेर काढा

[ad_1]

Broccoli Food Benefits: आपल्याला आपल्या आहारात निरनिराळे पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे रोज नवीन असं काय करावं हे प्रश्न आपल्यापुढे पडतो. त्यातून रोजच्या रोज तेच तेच पदार्थ खाणंही आपल्याला जमत नाही. त्याचाही आपल्याला अनेकदा कंटाळा आलेला असतो. त्यातून सतत काहीतरी नवीन पदार्थ खाण्यावर आपला भर असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पौष्टिक जेवण जेवणेही महत्त्वाचे असते. तुम्हाला माहितीये का की ब्रोकोलीचे अनेक फायदे आहेत जे तुम्हाला अक्षरक्ष: चकित करून टाकतील. आपल्याला ब्रोकोली हा पदार्थ पाश्चिमात्त्य आणि फक्त कुठला तरी शोभेचा पदार्थ वाटतो परंतु या पदार्थाचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया की नक्की या ब्रोकोलीचे फायदे काय आहेत. तुम्ही हे फायदे जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये तुम्हा याचा समावेश करू शकता. 

खरंतर पालेभाज्या आणि फळभाज्या खाण्यावर आपला भर हा अधिक असला पाहिजे. त्यामुळे अशावेळी नक्की काय करावे याकडे आपलं प्राधान्य असायला हवे. चला तर मग पटपट जाणून घेऊया की या हिरव्यागार ब्रोकोलीचे नक्की काय फायदे आहेत? ब्रोकोलीमध्ये अनेक फायदे असतात. त्यातून त्यातील गुणधर्मही अधिक आहेत. यामध्ये जिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, सी असे अनेक पोषक घटक असतात. त्यासोबत ब्रोकलीमध्ये पॉलिफेनल, क्वेरसेटिन आणि ग्लूकोसाईड असे अनेक पोषक तत्त्वेही आहेत. सोबतच डायबेटिज, रक्तदाब अशा काही रोगांवरही रामबाण उपाय ठरते. ब्रोकोलीच्या या गुणधर्मांवर आपण सविस्तर जाणून घेऊया. तुम्ही ब्रोकोलीचे विविध पदार्थ बनवू शकता. त्यातून सोबतच तुम्ही त्याला सलाडप्रमाणेही खाऊ शकता. 

हेही वाचा : ‘कपूर कुटुंबातील मुलींना चित्रपटात काम करण्याची परवानगी नव्हती, पण…’ करीनानं केला खुलासा

  • ब्रोकोलीचे आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून तुमची इन्मुनिटी वाढवण्यासाठाही ब्रोकोली मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि जिंक असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. 
  • त्वेचेसाठीही ब्रोकोली ही फार फायद्याची आहे. सोबतच तुम्हाला याचा फार चांगला फायदा होऊ शकतो. त्यातून ब्रोकोली हे आपलं शरीर डिटॉक्सीफाय करायलाही मदत करते. 
  • कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास ब्रोकोली मदत करते. यात तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 
  • आपले यकृतही निरोगी ठेवण्यास मदत होते. 
  • त्यातून तुमचे कर्करोगापासूनही बचाव करते. 
  • हाडे मजबूत करण्यासाठीही तुम्ही ब्रोकोलीचा उपयोग करून घेऊ शकता. 
  • तुमच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी करण्यासाठीही ब्रोकोली मदत करते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *