Headlines

Gold Jewellery: पायात का नाही घालत सोन्याचे दागिने? ‘त्या’ मागील 3 मोठी कारणं समोर

[ad_1]

Gold Jewellery :  फक्त महिलाच नाही तर, लहान मुलींना (woman love Gold Jewellery ) देखील दागिने घालण्यासाठी मोठी उत्सुकता असते. कोणताही सण किंवा कार्यक्रम असेल तर प्रत्येक स्त्री दागिन्यांमध्ये सजते. भारतीय संस्कृतीत दागिन्याला एक महत्त्वाचं स्थान आहे. महिलाचं नाही तर पुरुष देखील दागिने घालतात (Indians love Gold jewelry). विशेषतः महिलांना सोन्याचे दागिने फार आवडतात. पण तुम्ही महिलांना कधी पायता दागिने घालताना पाहिलं आहे? शक्यतो कधी नसेल पाहिलं. तर आज जाणून घेवू पायात दागिने का नाही घालत. 

कमरेच्या खाली सोने घालण्यास मनाई? 
सनातन धर्मानुसार कमरेच्या खाली सोन्याचे दागिने घालणं वर्ज्य मानले जातं. ते फक्त कंबरेच्या वरच्या भागात घातले जाऊ शकतात. याची एक नाही तर दोन कारणं आहेत. पायात सोने न घालण्याचे पहिले कारण वैज्ञानिक आहे. (Women’s Gold Jewellery)

पायत सोनं न घालण्याचं वैज्ञानिक कारण (scientific reason)
माणसाची शारीरिक रचना अशी आहे की त्याच्या शरीराच्या वरच्या भागाला थंडपणा आणि खालच्या भागाला फक्त उबदारपणाची गरज असते. सोन्याचे दागिने घातल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते.  (How does jewellery make a woman feel?)

त्यामुळे सोन्याचे दागिने पायात घातल्याने तुमच्या शरीराला हानी (physical loss) पोहोचू शकते. अशा स्थितीत पायात सोन्याऐवजी चांदीचे दागिने घातले जातात, जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहिल. 

पायत सोनं न घालण्याचं दुसरं कारण
अशी मान्यता आहे की, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सोनं प्रचंड प्रिय आहे (Vishnu and lakshmi loves gold). त्यामुळे नाभीच्या खाली म्हणजेच कंबरेपर्यंत ते घालण्यास मनाई आहे. जर तुम्ही पायात सोन्याचे दागिने घालत असाल, तर ते विष्णू आणि लक्ष्मीचा अपमान मानलं जातं. यामुळे तुमच्या घरातील सुख, शांती, ऐश्वर्य आणि समृद्धी दोन्ही नाहीशी होते… अशी समज आहे. 

पायात घातल्याने सोन्यावर धूळ चढते 
पायात सोन्याचे दागिने न घालण्याचे एक कारण म्हणजे धूळ आणि मातीमुळे ते खराब होवू शकतात. ज्यामुळे दागिण्याची चमक कमी होवू शकते. कंबरेच्या वर म्हणजे मानेवर, (gold necklace) नाकात, गळ्यात दागिने खराब होण्याचा धोका नसतो.  (Ladies Gold jewellery designs)

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. 24TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *