Headlines

Public Wi-Fi वापरताना घ्या काळजी, अन्यथा हॅकर्सकडे जातील महत्वाचे डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्ली: Using Public Wi-FI: अनेक वेळा लोक जेव्हा रेल्वे स्टेशनवर असतात आणि एखादे महत्वाचे काम करायचेअसते. तेव्हा ते त्यांचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप पब्लिक वायफायशी कनेक्ट करतात. यामुळे युजर्सची काम तर होते. पण तुम्हाला माहितेय का? यामुळे तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते, ज्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

वाचा: BSNL चा जबरदस्त प्लान! 600GB डेटासह फ्री OTT, व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची, रोजचा खर्च ५ रुपये

अनेकांनी पब्लिक वायफाय वापरले असेल. सहसा जेव्हा स्मार्टफोनचे नेटवर्क काम करत नाही, तेव्हा आपण स्मार्टफोनला सार्वजनिक वायफायशी कनेक्ट करण्याचा विचार करतो. पब्लिक वायफाय रेल्वे स्टेशन तसेच विमानतळ आणि अनेक कार्यालयांमध्ये उपलब्ध असते. परंतु, ते वापरताना खबरदारी घ्यावी. कारण, ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

वाचा: Flipkart Offers: डिस्काउंटनंतर कमी किमतीत खरेदी करता येणार ‘हे’ स्मार्टफोन्स, 5G सपोर्टसह मिळणार तगडी बॅटरी

हॅकर्स तुमची माहिती मिळवू शकतात:

सार्वजनिक वायफाय पूर्णपणे सुरक्षित नाही, जरी ते सरकारने किंवा खाजगी कंपनीने ते स्थापित केले असते. सार्वजनिक वायफायचा वापर करणाऱ्या युजर्सचे डिव्हाइस हॅकर्स सहज हॅक करू शकतात. हॅकर्स त्यांना सहजपणे लक्ष्य करतात आणि त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करून त्यांची फसवणूक करतात. म्हणूनच रेल्वे स्टेशनवर किंवा विमानतळावर गेला असता फक्त तुमच्या स्मार्टफोनच्या इंटरनेट वापरण्याचा प्रयत्न करा.

सोशल मीडिया हॅक :

सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती असते. तसेच, अनेक ग्रुप्स देखील असतात. जिथे, महत्वाच्या कार्यालयाच्या कामाची संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली जाते. परंतु, जर तुम्ही सार्वजनिक वायफाय वापरत असाल, तर हॅकर्स तुमच्या स्मार्टफोनवर हल्ला करू शकतात आणि तुमचा स्मार्टफोन सहजपणे हॅक करू शकतात. हॅकर्स Social Media अकाउंटवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून तुमच्या माहितीचा गैरवापर करू शकतात. तुम्हाला हे नको असेल तर तुमचा स्मार्टफोन पब्लिक वायफायशी जोडण्याची चूक करू नका.

वाचा: New Year ऑफर ! युजर्सना फ्री मिळणार ७५ GB डेटा, सोबत एक वर्षाची व्हॅलिडिटी, पाहा किंमत

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *