Headlines

Dream Girl 2 Movie Review: आयुष्यमान खुरानाची ‘ड्रीम गर्ल’ भावली! देसी विनोदाची ठसकेबाजी अन् बरंच काही

[ad_1]

Dream Girl 2 Movie Review : ड्रीम गर्ल म्हणजे काय? आपल्या स्वप्नातील अशी राजकुमारी जी आपल्या सर्वकाही मनोकामा पुर्ण करेल. ही ड्रीम गर्ल कधी कोणत्या रूपात भेटले याची काहीच शाश्वती नाही. ती भेटावी अशी मनोमनी प्रत्येकाचीच सुप्त इच्छा असते. अशी ही ड्रीम गर्ल प्रसिद्ध दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी रूपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. ही ड्रीम गर्ल (आयुष्यमान खुराना) प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी भेटताना दिसते. 

काय आहे कथामांडणी?

मथुरा स्थित मध्यमवर्गीय सिंग परिवारातल्या करम (करमवीर सिंग) ची ही गोष्ट आहे. आपल्या वडिलांनी (अन्नु कपूर) गावातल्या अनेक लोकांकडून कर्ज घेतलेली असतात आणि त्याचे वडील ही कर्ज फेडायला तेवढे सक्षम नसतात. करमची गर्लफ्रेंड परी श्रीवास्तव (अनन्या कपूर) ही एक ख्यातनाम वकील असते. जी आपल्याच वडीलांसोबत वकीलीची प्रॅक्टिस करत असते. एका गावातल्या सार्वजनिक सोहळ्यात त्यांचे एकमेकांवर आहे हे करमच्या आणि परीच्या वडिलांना कळते आणि थेट तिथूनच त्या दोघांच्या लग्नाची बोलणी सुरू होतात. 

लग्नाच्या बोलण्यांमध्ये परीच्या वडिलांना कळते की करमच्या वडिलांनी अनेकांकडून कर्ज घेतलेली आहेत जी त्यांनी अजून परत केलेली नाही. अशावेळी करमला आपला जवाई कसा काय करून घेणार? म्हणून जोपर्यंत त्याला नोकरी लागत नाही आणि त्याचे वडील ही सर्व कर्ज फेडत नाहीत तोपर्यंत परीचे वडील (मोहन जोशी) परीचं लग्न करमशी लावून द्यायला तयार होत नाहीत. त्यानंतर बापलेकाला कल्पना सुचते की बारमध्ये मुलीच्या वेशात जाऊन करम वडीलांचे कर्ज फेडू शकतो. याचवेळी ड्रीम गर्ल पूजा हे पात्र समोर येते. 

सुरूवातीला हा चित्रपट आपल्याला तितकासा खिळवून ठेवत नाही. परंतु जसजश्या पूजाच्या / करमच्या आयुष्यात विविध घटना घडायला लागतात तेव्हा प्रेक्षक म्हणून आपण त्यात गुंतत जातो. आयुष्यात चित्रविचित्र घटना घडायला लागल्या की नकळत त्याचं आपल्यालाच हसू वाटायला लागतं असं काहीच करमच्या बाबतीत त्याची ‘पूजा’ झाल्यानंतर होतं. यानंतरही एकेक पात्रं ही उलगडत जातात आणि पूजाची अधिकाधिक गोची होत जाते. मग खरी गंमतही उलगडत जाते. 

विविध रूपात भेटते ड्रीम गर्ल!

ही ड्रीम गर्ल अनेकांना विविध रूपात भेटते. करमच्या वडिलांनी कर्ज घेतलेले असतेच परंतु क्रेडिट कार्डचाही घोटाळा केलेला असतो. टायगर पांडे नावाच्या बॅंकरला ड्रीम गर्ल पहिल्यांदा फोनच्या माध्यमातून भेटते. करमचे वडील त्याला मुलगी होऊन बारमध्ये डान्स करून पैसे कमावण्याची संधी सोडू नको अशी विनवणी करत असतात. तेवढ्यातच या टायगर पांडेचा फोन येतो आणि मुलीच्या आवाजात बोलायला करम सुरूवात करतो. करमचा जवळचा मित्र स्मायली (मनजोत सिंग) याचीही एक प्रेयसी असते. परंतु तिचे वडील (परेश रावल) हे तिचं लग्न जोपर्यंत लावून देत नाहीत तोपर्यंत त्यांचा डिप्रेशनमध्ये गेलेला मोठा मुलगा शाहरूख (अभिषेक बॅनर्जी) याचे लग्न होत नाही. जर हे लग्न लावलं तर स्मायलीला 50 लाख रूपये मिळणार असतात. त्यासाठी करमचे वडील खोटं बोलून पूजा मानसोपचारतज्ञ असल्याचे सांगत पूजाला शाहरूखवर उपचार करण्यासाठी, त्याचे हास्य परत आणण्याची कामगिरी सुपूर्द करतात. पूजाला यश मिळते आणि स्मायलीच्या गर्लफ्रेंडचे वडील पूजाचे लग्न शाहरूखशी लावायला तयार होतात. पण त्यांच्या सावत्र मुलाला (राजपाल यादव) पूजा आवडू लागते.

यावेळी यात येतं ते अजून एक पात्र ते म्हणजे ज्या डान्सबारमध्ये पूजा काम करते तिकडचा मालक (विजय राज). हा सोना भाई अबू सलीम म्हणजे परेश रावल यांच्या बहीणीचा जुमानी (सीमा पाहवा) हिचा नवरा असतो. पण ते दोघं लवकरच घटस्फोट घेणार असतात. यावेळी शाहरूख आणि पूजाचे लग्नही लागते. तिथे हा सोना भाईही टपकतो. या सगळ्या गोलमालमुळे परेश रावल, राजपाल यादव, असरानी, मनोज जोशी, मनजोत सिंग, अन्नु कपूर यांच्याही भुमिकाही प्रभावी ठरतात. 

काय कमी, काय जास्त? 

‘ड्रीम गर्ल 2’चे कथानक हे योग्य पद्धतीनं मांडले आहे, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. अनन्याचे पात्र मध्येच उडी घेतल्यासारखं वाटते परंतु छोट्या भुमिकेतही ती भाव खाऊन जाते. चित्रपटात आयुष्यमान खुराना आपल्याला पूजाच्या वेशात अदाकारी, नृत्य आणि साजशृंगार करताना दिसतो. आयुष्यमानच्या पूजा या भुमिकेवर त्याची खास मेहनत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यातून त्याची पूजा, ही ड्रीम गर्लही प्रेक्षकांना प्रभावितही करते. काही पात्रं ही येतात आणि जातात असंही चित्रपटात होतं. जसे की टायगर पांडे. ज्येष्ठ अभिनेते असरानी यांच्याही पात्राचे असेच काहीसे होते. परंतु त्याचा वावर चित्रपटाचा प्लस पॉंईटही ठरतो. एकावेळी अनेक पात्रांची एकत्र गुंफण यावेळी दिग्दर्शकानं चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात काही विनोद हे उगाचच घुसवले आहेत असे वाटतात तर काही डबल मिनिंगचेही विनोद हसवत नाहीत. तरीही हा चित्रपट प्रेक्षकांचा टाईमपास करतो. आयुष्यमान खुरानाच्या अभिनयासाठी नक्की पाहावा असा ड्रीम गर्ल आहे. 

चित्रपट : ड्रीम गर्ल 2 
कलाकार : आयुष्यमान खुराना, अनन्या पांडे, अन्नु कपूर, परेश रावल, राजपाल यादव, विजय राज, असरानी, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग
दिग्दर्शक : राज शांडिल्य 
निर्माती : एकता कपूर, शोभा कपूर
स्टार्स : 3.5/5 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *