Headlines

‘दिवसभर प्रवास, रात्रभर शूटींग आणि 9 वेळा…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा तो व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Ashwini Mahangade Viral Video : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. अश्विनीने या मालिकेत राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. सध्या अश्विनी ही अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सक्रीय असते. आता अश्विनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

अश्विनी महांगडेचा व्हायरल होणार हा व्हिडीओ झी टॉकीजच्या एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट असलेल्या संजना दुताळ यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अश्विनी ही शूटींग करताना दिसत आहे. यावेळी ती वेगवेगळ्या साड्या आणि लूकमध्येही दिसत आहे. हे शूट करताना ती अजिबात थकलेली दिसत नाही. 

अश्विनी महांगडेचा तो व्हिडीओ चर्चेत

दिवसभर प्रवास करून रात्रभर शूटींग करत असतानाही ताईंची energy level बघू शकता. आणि तेही साड्यांचे 9 changes करुन.. Every time smiley face कलाकार थकून जमत नाही…, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहेत. अश्विनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अश्विनीने धन्यवाद असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. 

आणखी वाचा : ‘…तर राजकारणात यायला नक्कीच आवडेल’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे वक्तव्य, म्हणाली “सगळ्या जाती-धर्मांना एकत्र…”

दरम्यान अश्विनी महांगडेने काही दिवसांपूर्वी मला राजकारणात यायला नक्की आवडेल, असे वक्तव्य केले होते. “मी आताही राजकारणात आहे कारण, मी एक मतदार आहे. मतदार हा राजकारणातील सर्वात मोठा भाग आहे. कोणी आमदार आहेत, कोणी खासदार आहेत पण, यापेक्षा त्यांना निवडून देणारा मतदार हा सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे पुढे जाऊन जर मला संधी मिळाली, तर लोकांसाठी काम करायला नक्की आवडेल. यामुळे माझाही आवाका वाढेल”, असे अश्विनी महांगडेने म्हटले होते. 

सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत झळकत आहे. यात ती अनघा हे पात्र साकारत आहे. या मालिकेबरोबरच अनेक मालिकांमध्ये झळकली. झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिने राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने ‘मेरे साई’ या मालिकेतही काम केले होते. या मालिकेतील तिच्या पात्राचे कौतुक केले गेले. आता लवकरच अश्विनी ही ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या चित्रपटात झळकणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *