Headlines

क्रिकेटच्या देवालाही Baipan Bhaari Deva ची भुरळ; ‘चारू’ला व्हिडीओ कॉलवर म्हणाला की…

[ad_1]

Sachin Tendulkar Video Call : बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांना गेल्या महिन्याभरापासून टक्कर देणारा बाईपण भारी देवाची जादू दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी दिसून येतं आहे. अशातच मराठमोळा आणि मुंबईकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही चिपत्रटगृहात पोहोचला. हा चित्रपट पाहून क्रिकेटचा देवही भारावून गेला. खुद्द या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सचिन तेंडुलकरसाठी खास शोचं आयोजन केलं होतं. (sachin tendulkar Watch baipan bhaari deva heart touching story sachin-tendulkar video call to baipan bhaari Instagram post)

चित्रपट पाहिल्यानंतर सचिनही आनंदी झाला. कलाकारांचं अभिनय पाहून त्यालाही हा चित्रपट खूप आवडला तसं त्याने उपस्थित असलेल्या चित्रपटाच्या टीमला सांगितलं. यावेळी या चित्रपटातील अभिनेत्री दीपा चौधरीला कोणीतरी व्हिडीओ कॉल लावला अन् तिची आणि सचिनचं बोलणं करुन दिलं. यावेळी सचिनं दीपाचं तोंडभरुन कौतुक केलं. ”मला हा चित्रपट खूप आवडला असंही तो म्हणला. अभिनंदन, भेटुया आपण सर्व. अजित माझ्या बाजुलाच आहे. मी त्याला तेच सांगत होतो. All The best”

सचिन सोबतचा हा व्हिडीओ कॉलने भारवून गेलेली दीपाने आपल्या इन्स्टाग्रामवर तिने हा व्हिडीओ कॉल शेअर करत आपलं मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. ती म्हणाली की, ”THE DREAM COME TRUE MOMENTसचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील… त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. पण…YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण.”

”6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा”

तर सचिन तेंडुलकरनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटातील कलाकारांसोबतचा फोटो शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे. 

तो म्हणला की, ”बाईपण भारी देवा ही 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी माझ्या आई आणि मावशीला हा चित्रपट पाहण्यासाठी आग्रह करणार आहे. त्यासोबतच कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *