Headlines

राज ठाकरे-एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र; सत्तांतराचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले “मागील दहा वर्षांचा…” | cm eknath shinde and raj thackeray together present in programme said will meet together in future

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शिंदे बऱ्याच कार्यक्रमांत एकत्र दिसत आहेत. आजदेखील (२ नोव्हेंबर) शिंदे आणि राज ठाकरे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी आणि सत्तांतर यावर भाष्य केले आहे. तसेच राज ठाकरे आणि मी बऱ्याच कार्यक्रमात एकत्र येत असून मागील दहा वर्षांचा बॅगलॉक भरून काढत आहोत, असे शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Floating Solar Panel Project : भागवत कराड यांच्या आरोपानंतर जयंत पाटलांचे खुले आव्हान, म्हणाले “एकतरी कागद…”

“ध्येय्यवेडे इतिहास घडवतात. आम्ही साडे तीन महिन्यांआधी एक मोठी दौड लगावली होती. त्या काळात आम्ही कुठून कुठे गेलो, याची आम्हाला कल्पना नाही. लोकांना मात्र याबाबत सर्व माहिती आहे. जनतेच्या मनात जे होतं तेच आम्ही केलं. आता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. राज ठाकरे आणि मी अनेक कार्यक्रमांत एकत्र येत आहोत. मागील दहा वर्षांचा बॅकलॉक आम्ही भरून काढत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> “आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले “भारतमाता विधवा…”

छत्रपती शिवाजी महाराज यांचं रुप आठवलं की त्या कळातील गडकिल्ले, त्या काळातील स्थापत्यशास्त्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर हे साध्या माणसाचे काम नाही, असे वाटते. शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट आहे. या चित्रपटाला चांगले यश मिळणार आहे. पूर्ण देश तसेच जगभरात हा चित्रपट लोकप्रिय होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *