Headlines

अरबाजसोबत ब्रेकअप का केलास? जॉर्जिया म्हणाली ‘मलायकासह असणारं त्याचं नातं…’

[ad_1]

Giorgia Andriani on breakup with arbaaz khan : मॉडेल आणि लोकप्रिय डान्सर जॉर्जिया एंड्रियानी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अरबाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही दिवसांपूर्वी ते दोघं विभक्त झाल्याची चर्चा सुरु होती. त्यावर आता जॉर्जियानं वक्तव्य केलं असून अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराचा देखील उल्लेख केला आहे. नक्की कशामुळे जॉर्जिया आणि अरबाजचा ब्रेकअप झाला याविषयी सगळ्यांनाच जाणून घ्यायचे आहे. 

जॉर्जिया तिच्या आणि अरबाजच्या रिलेशनशिपविषयी बोलताना म्हणाली की ‘आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि कायम चांगले मित्र राहू. त्यावेळी आम्ही मित्रांपेक्षा जास्त होतो. आमच्यात नेहमी चांगले संबंध राहतील. त्यासोबत मला वाटतं हे देखील एक कारण होतं. ज्यामुळे इतक्या लवकर मित्र होणं कठीण आहे. मला असं वाटतं की सुरुवातीपासून आम्हाला माहित होतं की हे कायम स्वरुपासाठी राहणार नाही. मात्र, आमच्यात हे मान्य करण्याची हिंम्मत नव्हती.’ 

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खान आणि मलायका अरोराच्या नात्यावर बोलताना जॉर्जिया म्हणाली, ‘त्याचा माझ्या बॉन्डवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचं मलायकासोबत जे नातं होतं, ते माझ्या नात्याच्यामध्ये कधीच आलं नाही. त्यांचं नातं आधीच संपलं होतं. असं समजा की याला दोन वर्षे झालेत, पण खऱ्या आयुष्यात त्यांचा घटस्फोट त्याच्या एक- दीड वर्ष आधीच झाला होता.’ तर अरबाज आणि मलायका घटस्फोटानंतर एकत्र मिळून मुलाचा सांभाळ करत आहेत.

पुढे अरबाजसोबतच्या ब्रेकअपवर जॉर्जिया म्हणाली, ‘अरबाज आणि तिनं एकत्र मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तर अरबाजच्या मनात कायम तिच्यासाठी भावना राहतील.’

हेही वाचा : Animal Box Office Collection Day 1 : पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ नं केला 100 कोटींचा आकडा पार!

अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयात 20 वर्षांचा फरक आहे. त्यामुळे ते अनेकदा चर्चेच असायचे. त्यांच्यात असलेल्या वयावर अरबाज सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला होता की ‘आमच्यात वयाचा खूप मोठा फरक आहे, पण आमच्यात दोघांनाही कधी हे जाणवलं नाही. मी कधी-कधी तिला विचारतो की हे खरंच आहे का? पण जेव्हा तुम्ही कोणत्या नात्यात असतात, तेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करत नाहीत. पण जेव्हा तुम्ही त्यात खूप वेळ राहता, त्यात अनेक प्रश्न असतात ज्यांची उत्तर देण्याची गरज पडत नाही. मला वाटतं की आम्ही आमच्या आयुष्याच्या त्या टप्यावर आहोत, जिथे आम्ही विचार करतो की आम्ही कसे असू आणि आम्हाला हे नातं पुढे घेऊन जायचं आहे की नाही. यावर इतक्यात काही बोलणं योग्य नाही.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *