Headlines

Chitra Wagh criticizes Uddhav Thackeray saying you are dragging a one and a half year old baby into politics msr 87

[ad_1]

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि त्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून नवा वाद सुरू झाला होता. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही बाजूने ताकद पणाला लावली गेली आणि अखेर न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी येथे झाला. या दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका, आरोप झाले. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातावाचाही उल्लेख केल्याने, एकनाथ शिंदेंना राग अनावर झाल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. उद्धव ठाकरेंच्या त्या विधानवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आता यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शिवसैनिक सोडून स्वत:ला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा शिवसैनिक सोडून स्वत:ला पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून स्वत:च्या मुलाला मंत्रीपद, एखाद्या महिला शिवसैनिकेला सोडून स्वत:च्या घरात संपादक पद. माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल?” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

याशिवाय “शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या पातळीला या अगोदर कधी गेलं नव्हतं आणि ज्यांनी नेलं त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.” असंही चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर व्हिडीद्वारे म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? –

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे.” असं म्हटलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय दिलं प्रत्युत्तर? –

“माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर. कोणत्या पातळीवर पोहोचला आहात? पायाखालची वाळू सरकली ना. तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो का? लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *