Headlines

chandrashekhar bawankule taunt sharad pawar over prime minister post ssa 97

[ad_1]

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे कधीही ५०-५५ पेक्षा आमदार निवडून आले नाही. त्यांनी आजपर्यंत तोड, फोडीचे राजकारण केलं. आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिलं. मात्र, ते कधीही पंतप्रधान बनू शकते नाहीत, भविष्यात होतील की माहिती नाही, असा टोमणा बावनकुळे यांनी शरद पवारांना मारला आहे. ते पुण्यात बोलत होते.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने सुरुवातीला मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर निवडणुकीतून माघर घेत असल्याचं जाहीर केलं. त्यावरून ठाकरे गटाकडून भाजपावर टीकास्त्र डागण्यात येत होते. यावरही चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार जे बोलले, ती स्क्रिप्ट होती का? शरद पवारांनी महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास याचा दाखला दिला. त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला विनंती केली होती. राज ठाकरेंनीही विनंती केली होती. शरद पवारांच्या बोलण्यात भाजपानं उमेदवार मागे घेण्याबाबत विचार करण्याचा संदर्भ होता.”

हेही वाचा : संजय देशमुखांचा ठाकरे गटात प्रवेश; संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “यापुढेही माझं…”

“जेव्हा आम्ही संस्कृती पाळली…”

“उद्धव ठाकरेंनी तर उलट त्यावर प्रतिक्रियाही दिली होती की शरद पवार योग्य बोलत आहेत, भाजपानं त्यांची संस्कृती पाळायला हवी वगैरे. पण जेव्हा आम्ही संस्कृती पाळली, दिवंगत आमदाराच्या पत्नीला मदत करण्याचा प्रयत्न केला तर ते उलट आमच्यावर बोंबा मारत आहेत,” असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे गटावर केला आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; म्हणाले, “तुम्ही सभा लावा, मी…”

“आत्ता तुम्ही गाव गाव आणि वसत्या-वसत्या…”

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीच्या समस्येकडे सरकार लक्ष देत नसल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली होती. या टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सुप्रिया सुळे स्वत: खासदार आहेत. गेली अडीच वर्ष राज्यात तुमचं सरकार होतं. त्यामुळे आत्ताच्या सरकारकडे बोट दाखवून तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. आत्ता तुम्ही गाव गाव आणि वसत्या-वसत्या फिरु लागल्या आहात,” असे बावनकुळेंनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *