Headlines

Chanakya Niti: या तीन स्वभावाच्या लोकांपासून ताबडतोब दूर व्हा! अन्यथा जीवन होईल नरकमय

[ad_1]

Chanakya Niti for Happy Life: चाणक्य नीतिबाबत आजही लोकांमध्ये कुतुहूल आहे. कारण चाणक्य नीतित सांगतलेली धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. दैनंदिन जीवानातील अनेक बाबी चाणक्य नीतित सांगितल्या आहेत. त्यात कोणत्या व्यक्तीसोबत राहावं आणि कोणाला मदत करावी याबाबतही सांगितलं आहे. गरजूंना मदत करावी असं आपल्याला सांगितलं जातं. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, मदत करण्यापूर्वी तुम्हाला लोकांच्या चारित्र्याबाबत माहिती असणं गरजेचं आहे.  चांगल्या आयुष्यासाठी प्रत्येक जण कष्ट करून पैसे कमावतो. पण कधी कधी पैसा असूनही चुकीच्या संगतीमुळे जीवनात अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांनी सुखी जीवनासाठी काही उपाय सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी जीवनात तीन लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगितले आहे. जर या तीन लोकांना आयुष्यातून काढून टाकले तर माणसाला आनंदी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 

चारित्र्यहीन पत्नी- आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार घरात चारित्र्यहीन पत्नी असेल तर तुमचे सुखी जीवन मृत्यूसारखं असतं. ज्या घरात अशी स्त्री राहते ते घर नरकासारखं असतं. अशा घरात नेहमी कलह, भांडणे होतात, त्यामुळे माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होते.

दु:ख सांगणाऱ्या व्यक्ती- आचार्य चाणक्य यांच्या मते, दुःखी लोकांपासून नेहमी कायम लांब राहावे. कारण असे लोक इतरांच्या सुखाचा तिरस्कार करतात आणि त्यांच्याबद्दल वाईट भावनाही बाळगतात. त्यांच्या संगतीमुळे जीवन नेहमीच नकारात्मक राहतं. कारण ते फक्त दुःखी असल्याचे ढोंग करतात.

कोजागरी पौर्णिमेला ग्रहांचा अद्भुत संयोग, देवी लक्ष्मीची पूजा आणि राशीफळ जाणून घ्या

आत्मसंतुष्ट व्यक्ती- आचार्य चाणक्य यांच्या मते, आत्मज्ञानी किंवा मूर्खाला मदत करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. असे लोक नेहमी तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. या लोकांना मदत केली तर ते तुमच्याशी अहंकाराने वागतात. 

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *