Headlines

Chanakya Niti: पतीने ‘या’ गोष्टींची मागणी केली तर पत्नीने नकार देऊ नये, नात्यात येणार नाही कधीच दुरावा

[ad_1]

Chanakya Niti : लग्न झाले की अनेक वेळा भांड्याला भांडे लागते आणि खटके उडू लागतात. मात्र, पती आणि पत्नीमधील नातेसंबंध चांगले राहावे यासाठी काही गोष्टी केल्या तर जिवनात गोडवा निर्माण होतो. वैवाहिक जीवन आणि पती-पत्नीचे नाते नेहमी एकमेकांच्या समन्वयावर अवलंबून असते आणि वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे महान विद्वान, अर्थतज्ञ आणि मुत्सदी होते. त्याचबरोबर चाणक्य (Chanakya Niti) नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जर वैवाहिक जीवनात त्या गोष्टींचा अवलंब केला तर वैवाहिक जीवन सुखी होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे कोणत्या त्या तीन गोष्टी आहेत त्याबद्दल जाणून घेऊया… 

 

पतीचे मन शांत करा

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात सांगितले की, जेव्हा कोणत्याही पुरुषाला सर्वात जास्त त्रास होतो, त्यावेळी त्याला आपल्या जोडीदाराचा विशेष आधार हवा असतो. असे असताना पतीच्या सर्व गोष्टींची काळजी घेणे आणि दुःखी असताना त्याचे मन शांत करण्याचा प्रयत्न करणे हे पत्नीचे कर्तव्य असते. जेव्हा पतीला एखाद्या गोष्टीची चिंता सतावत असते तेव्हा त्याला शांती देणे हे पत्नीचे कर्तव्य असते. जर वैवाहिक नात्यात दोघांनी असे समजुतदाराने राहिल्यास पती-पत्नीच्या नात्यात कधीच दुरावा येत नाही. 

वाचा :  मोठी बातमी! ज्येष्ठ माध्यमकर्मी, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन 

पतीला प्रेमाने समाधान करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीचे नाते तेव्हाच यशस्वी होते जेव्हा दोघे एकमेकांच्या सुख-दु:खाची काळजी घेतात. तसेच पतीची कोणतिही इच्छा असेल तर पत्नीने ती प्रेमाने पूर्ण करावी. त्याचबरोबर पत्नीची इच्छा पूर्ण करणे हे देखील पतीचे कर्तव्य आहे. असे न केल्यास पती-पत्नीमध्ये भांडणे होतात आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. 

वैवाहिक जीवनातील दुरावा संपवा

चाणक्य नीतीनुसार, सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकमेकांमध्ये कधीही अंतर येऊ देऊ नये. वैवाहिक जीवनात कधीही तेढ निर्माण होऊ न देणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. तसेच पतीने देखील आपल्या पत्नीशी असेच वागले पाहिजे.

 

(येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *