Headlines

Breaking : T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी

[ad_1]

BCCI Sacks National Selection Committee:​ ऑस्ट्रेलियात (Australia) नुकत्यात पार पडलेल्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघाला (Team India) सेमीफायनलमध्येच (Semi Final) बाहेर पडावं लागलं होतं. सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून भारताचा (England Defeat India) लाजीरवाणा पराभव झाला. यानंतर टीम इंडिया आणि बीसीसाआयवर (BCCI) मोठ्या प्रमाणावर टीका झाली. भारतीय टीममधल्या काही खेळाडूंच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

बीसीसीआयने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून सर्व निवडकर्त्यांची (National Selectors) हकालपट्टी केली आहे. तसंच नवीन अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात एक ट्विट करत ही माहिती दिली आहे.  चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वातील निवड समितीच्या सर्व सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली असून सर्व चार जागांसाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. नवीन जागांवर नियुक्ती होईलपर्यंत चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच काम पाहाणार आहे.

निवड समितीत कोण होतं?
चेतन शर्मा (उत्तर विभाग) यांच्याबरोबर  हरविंदर सिंह (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबांशीष मोहंती (पूर्व विभाग) यांचा निवड समितीत समावेश होता. यांच्यातील काही सदस्यांची नियुक्ती 2020 मध्ये करण्यात आली होती. 

बीसीसीआयने मागवले अर्ज
बीसीसाआयने आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय निवड समितीच्या चार जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अटी असतील. 

A) कमीत कमी सात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले असावेत
B) किंवा 30 प्रथम श्रेमीचे सामने खेळले असावेत
C) 10 आंतरराष्ट्रीय एकदिवस सामने आणि 20 प्रथम श्रेणीचे सामने खेळले असावेत
D) जो उमेदवार अर्ज करणार आहे, त्याने पाच वर्षाआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतलेला असावा

याशिवाय ज्या उमेदवाराने पाच वर्षांसाठी कोणत्याही क्रिकेट समितीचं सदस्यपद भूषवलं असेल तो या राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य बनण्यास पात्र नसेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *