Headlines

औरंगाबादेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे आंदोलन, केली ‘ही’ मागणी; अंबादास दानवेंनीही दिला पाठिंबा | aurangabad police recruitment aspirants protest against ncc cadet concession

[ad_1]

मागील अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये रोष आहे. असे असताना आता औरंगाबादेत पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करणारे उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या नव्या निर्णयाला विरोध केला असून एनसीसीच्या मुलांना आगावीचे गुण देऊ नयेत, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला असून आंदलोकांचे मत सरकारपर्यंत पोहोचवणार, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेही वाचा >>> दसरा मेळाव्यात भाषण करू न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजी? उदय सामंतांनी नेमकं सांगितलं; म्हणाले…

राज्य सरकारने जारी केलेल्या एनसीसीसंदर्भातील नव्या शासन निर्णयाविरोधात पोलीस दलात सामील होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून रोष व्यक्त केला जातोय. औरंगाबादेत हे उमेदवार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस भरती प्रक्रियेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अधिक पाच गुणांची सवलत देऊ नये. त्यापेक्षा त्यांना विशेष राखीव जागा द्याव्यात अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व मंतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट-भाजपाकडून कोणाला उमेदवारी? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

“एनसीसीच्या विद्यार्थ्यांना राखीव जागा द्याव्यात. पण समान गुण मिळाल्यानंतर एनासीसीच्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे याबाबत काही ठोस उपाय करावा, अशी मागणी मी विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारकडे करणार आहे, असे अंबादास दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *