Headlines

Astro Tips: घर खरेदीसाठी येतेय अडचण! मग करा हे 5 सोपे उपाय

[ad_1]

Astrology Tips For Home: आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकांचं स्वप्न असतं. त्यासाठी नवरा-बायको खूप कष्ट करतात आणि आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार घर घेण्याचा प्रयत्न करतात. पण वाढलेल्या महागाई आणि घरांच्या किंमती पाहता अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. अनेक वेळा लाख प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. ज्योतिष्यशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत काही ग्रह दोष असेल तर घर खरेदीमध्ये अडचणी येतात असं म्हटलं जातं. जर तुम्हाला ही घर खरेदी करताना काही अडचणी येत असेल तर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. (trending news astro tips for astrology upay for home do these remedies for buying own house in marathi)

हे सोपे उपाय करुन बघा

1. ज्योतिषशास्त्रानुसार गणरायाची नियमित पूजा-अर्चा केल्यास तुमचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं. गणपतीला नियमितपणे लाल रंगाची फुलं अर्पण केली पाहिजे. 

2. पाच मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन गूळ आणि गहू अर्पण केल्यास घर खरेदीतील अडथळे दूर होऊ शकतात. 

3. अनेक प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल तर कडुलिंबाचे छोटे घर बांधून एका गरीब मुलाला द्या किंवा एखाद्या मंदिरात ठेवा. 

4. लाल रंगाच्या कपड्यात  6 चिमूटभर कुमकुम, 6 लवंगा, नऊ टिकली, 6 कोवळ्या आणि नऊ मूठ माती घेऊन त्याची पोटली बनवा आणि नदीत ती प्रवाहित करा. 

5. कुंडलीतील ग्रह तुमच्या घरासंबंधित खरेदीमध्ये अडचणी निर्माण करतात म्हणून अशावेळी एखाद्या ज्योतिषला आपली कुंडली दाखवून त्यांनी सांगितलेले उपाय करुन बघा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *