Headlines

Astro Tips: एक रुपयाच्या नाण्यामुळे तुमचं भाग्य उजळेल! काय सांगतं ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

[ad_1]

One Rupee Coin Totke: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अनेक चढउतार येतात. अडचणींवर मात मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. यासाठी कठोर परिश्रम केले जातात. जेणेकरून कुटुंबाला कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. मात्र कष्ट करूननही अपेक्षित फळ मिळत नाही. त्यामुळे माणूस पुरता खचून जातो. पैशांची चणचण माणसाला तणावात टाकतो. ज्योतिषशास्त्रात आर्थिक संकटातून बाहेर येण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्रात एक रुपयाच्या नाण्याचा उपाय सांगितला आहे. या उपयांनी आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रातील उपाय…

पैशाच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय

जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ज्योतिषशास्त्रातील हा उपाय एकदा करून पाहा. मूठभर तांदूळ आणि एक रुपयाचे नाणे घेऊन मंदिरात जा. देवासमोर प्रार्था करा. यानंतर मंदिराच्या एका कोपऱ्यात तांदूळ आणि नाणे ठेवा. हे काम शांतपणे करा. यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर करा.

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी

ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक संकट दूर करण्यासाठी शुक्रवारी घरातील मंदिरात पूजा करा. एका कोपऱ्यात पाण्याने भरलेला कलश ठेवा. कलशावर कुंकूवाने स्वस्तिक काढा आणि त्यावर एक रुपयाचे नाणे ठेवा. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक स्थिती मजबूत असेल.

आर्थिक अडचण येणार नाही!

तुम्हाला आयुष्यात भरपूर पैसे कमवायचे असतील तर एक रुपयाचे नाणे पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवा. यानंतर नाण्यासोबत मोराचे पिसे ठेवा. असे केल्याने व्यक्तीची पर्स कधीही रिकामी होत नाही. व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

बातमी वाचा- Budh Gochar 2022: डिसेंबर महिन्यात या राशींचं नशीब चमकणार, कसं फळ मिळणार; जाणून घ्या

गरीबी दूर होईल!

घरातील गरिबीमुळे व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर चौमुखी दिवा लावावा. यानंतर या दिव्यात एक रुपयाचे नाणे ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *