[ad_1]
Anushka Sharma: अनुष्का शर्मा सध्या नवे शोज्स प्रोड्यूस करण्यात रमली आहे. नुकतीच तिची माई ही वेबसिरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. आपली मुलगी वामिकासोबत आणि पती विराट कोल्हीसोबत अनुष्का आपला पर्सनल वेळ घालवताना दिसते आहे.
परंतु सध्या अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आपल्या प्रेग्नन्सीला घेऊन केलेलं वक्तव्य सध्या व्हायरल होते आहे. अनुष्काने त्यावर एक मोठा खुलासा केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अनुष्काला सुरूवातीला आई होण्याची भिती वाटत होती असं तिने स्पष्ट केले होते यावर ती म्हणाली की, मला आई होण्याची सुरूवाती फार भिती वाटत होती आणि आई झाल्यानंतर मी कशी असेन याचीही मला कल्पना नव्हती.
अनुष्का शर्माने पुढे खुलासा केला की, तिला सुरुवातीला आई होण्याची भीती वाटत होती आणि तिला आई व्हायला आवडणार नाही का? पण, तिला मूल झाल्यापासून ती व्यक्ती म्हणून खूप मोठी झाली आहे, असे तिला वाटते. “जेव्हा तुम्ही तुमच्यावर अवलंबून असलेल्या एखाद्यासाठी (बाळासाठी) पूर्णपणे जबाबदार असता, तेव्हा तुमच्याकडे कमी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी वेळ नसतो.
आज जेव्हा मी आणि विराट माझ्या बाळंतपणाच्या त्यावेळच्या सगळ्या गोष्टींना आठवतो तेव्हा आज आम्हाला कळते की आम्ही केलेली काळजी बऱ्याच गोष्टींच्या मानाने खूपच शुल्लक होती. आज जेव्हा मी स्वतःकडे पाहते तेव्हा मला समजतं की आज मी खुप गंभीर आणि मी घेतलेले सर्व निर्णय हे माझ्यासाठी अगदी योग्य ठरले आहेत, अशी भावना अनुष्काने व्यक्त केली.
अनुष्का शर्मा लवकरच चक्डा एक्सप्रेस या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
[ad_2]