Headlines

अमिताभ बच्चन यांनी भीती पोटी हात जोडून केली ‘ही’ विनंती

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमिताभ हे सध्या ‘कौन बनेगा करोडपतीच्या 14’ (Kaun Banega Crorepati 14) व्या पर्वाचे सुत्रसंचालन करत आहेत. दरम्यान, यावेळी अमिताभ यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये त्यांना कसली भीती वाटते या विषयी सांगितले आहे. 

अमिताभ यांचे यंदाच्या वर्षी अमिताभ यांचे 6 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर लवकरच अमिताभ यांचा ‘ऊंचाई’ (Uunchai)  हा सातवा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सूरज बडजात्या यांचा हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्याची बॉलिवूड चित्रपटांची अवस्था पाहता अमिताभ हे घाबरले आहेत. काही चित्रपट वगळले तर बॉक्स ऑफिसवर कोणत्याही बॉलिवूड चित्रपटानं चांगली कमाई केली नाही. यात अमिताभ यांचा गुडबाय हा चित्रपट देखील फ्लॉप झाला. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांना काळजी वाटत असून त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. 

हेही वाचा : ‘बघतोय रिक्षावाला…’, फेम मानसी नाईक आणि पती प्रदीप खरेराच्या नात्यात दुरावा ? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

‘ऊंचाई’ रिलीज होण्यापूर्वी अमिताभ यांनी ही विनंती ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर केली आहे. ‘ऊंचाई’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पोहोचले नाही तर काय होईल? या भीतीच्या पार्श्वभूमिवर विनंती केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमध्ये ‘ऊंचाई’ चित्रपटाचे कलाकार अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता प्रमोशनसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी हात जोडून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना विनंती केली आहे. 

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘थिएटरमध्ये जाण्याची, तिकीट काढण्याची आणि चित्रपट पाहण्याची मज्जा काही औरच असते. आमचा चित्रपट पाहण्यासाठी कृपया थिएटरमध्ये जा. या दिवसांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. थिएटरमध्ये कोणी जात नाही. आम्ही हात जोडतो, कृपया तिकीट घेऊन जा. (Amitabh Bachchan Scared About This Thing Request audience watch video) 

दरम्यान, ‘ऊंचाई’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्याशिवाय या चित्रपटात डेनी डेन्झोग्पा देखील आहेत. हा चित्रपटात चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. एक मित्र एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न पाहतो. पण तो मरतो. मग इतर तीन जुने मित्र या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी शपथ घेतात. या चित्रपटात परिणीती चोप्राचीही महत्त्वाची भूमिका आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *