Headlines

पुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!

[ad_1]

Alia Bhatt 2nd Pregnancy : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbirr Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे एप्रिल 2022 च्या सुरुवातीला लग्न बंधनात अडकले. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलियानं राहाला जन्म दिला. राहाच्या जन्माला अवघे अडीच वर्षे झाले असून आलिया पुन्हा एकदा प्रेग्नंट (Alia Bhatt Pregnant) आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. राहाला (Raha) जन्म दिल्याच्या दोन महिन्यांनंतर आलिया पुन्हा आई होणार आहे का? असा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित राहिला आहे. दरम्यान, आलियाचा एक नवीन व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे बेबी बंप दिसत असल्याचे म्हटले जात आहे. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

आलियाचा हा सूर्यनमस्कार करताना व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सूर्यनमस्कार पूर्ण झाल्यानंतर आलिया स्वत: ला कसं ट्रीट करते ते पाहायला मिळत आहे. आलियाचा हा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, आलियानं 108 सूर्यनमस्कार केले आहेत. आलिया बसल्यानंतर तिच्या पोटाकडे अनेकांचे लक्ष गेले. तर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Alia Bhatt Viral Video) 

या व्हिडीओत आलियाला समोरची व्यक्ती प्रश्न विचारते की राहाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदा 108 सूर्यनमस्कार केल्यानंतर कसं वाटतय. यावर उत्तर देत आलिया म्हणते ‘पावरफूल’. आलियाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता आलिया लवकरच दुसऱ्या बाळाविषयी गोड बातमी देईल असे म्हटले जात आहे. मात्र, या बातमीवर आलिया किंवा रणबीरनं दुजोरा दिलेला नाही. 

आलियानं पापाराझींना मुलीचा चेहरा न दाखवण्याचे केले आवाहन

‘आम्हाला माहिती आहे की, हे तुमचं रोजचं काम आहे. आम्हालाही तुमची तितकीच गरज आहे, जितकी तुम्हाला आमची गरज असते. पण काहीही करा ‘राहा’चा चेहरा समोर येता कामा नये. त्या जागी वडा पाव आणि भजी लावा. आमची विनंती आहे चुकूननही राहाचा चेहरा दिसता कामा नये. फ्रेममध्ये असल्यास तिला कृपया दाखवू नका. आई-वडील म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे,’ असं आलियाने पॅपराजीला सांगितलं.

हेही वाचा : आईच्या निधनानंतर Rakhi Sawant ला आली Salman Khan ची आठवण, म्हणाली…

‘आम्हाला राहाचा चेहरा दाखवयचा नाही असं काही नाही. पण सध्या ती लहान आहे. अशात किमान दो वर्षे तरी तिला या जगापासून दूर राहू द्या. दोन वर्षानंतर आम्हीच तिला तुमच्यासमोर आणू. आई वडील म्हणून सध्या आम्हाला तिची काळजी आहे’, असं देखील आलिया आणि रणबीरनं सांगितलं. दुसरीकडे या मीटिंगमध्ये सर्व पापाराझींना राहा कपूरचा फोटो दाखवला. पण त्यानंतर फोटो काढण्यास सक्त मनाई केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *