Headlines

पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीपमधील फोटो पाहून मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली ‘माझा देश…’

[ad_1]

Arya ambekar PM Modi Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत विविध कारणांनी चर्चेत असतात. आता सध्या ते लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केले होते. आता या फोटोवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कमेंट केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोंची चर्चा रंगली आहे. यातील एका फोटोत मोदी हे समुद्रकिनाऱ्यावर उभे असल्याचं दिसत आहे. तर एका फोटोत मोदी हे समुद्रकिनारी खुर्चीवर बसून अथांग समुद्र न्याहाळताना दिसत आहेत.

 

नुकतंच प्रसिद्ध मराठमोळी गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने मोदींचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत नरेंद्र मोदी हे लाइफ जॅकेट घालून समुद्रातून बाहेर येताना दिसत आहेत. 

या फोटोला कॅप्शन देताना आर्या आंबेकरने मोदींचे कौतुक केले आहे. “माझा देश हा खरोखरच सर्वोत्तम आहे आणि या देशाचे पंतप्रधानही सर्वोत्कृष्ट आहेत”, असे आर्या आंबेकरने म्हटले आहे. आर्या आंबेकरने शेअर केलेल्या या स्टोरीवर भारताचा तिरंगा असलेला इमोजीही पोस्ट केला आहे. 

 

arya ambekar post

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्षद्वीपमधील फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत पंतप्रधान मोदींनी केलेले स्कूबा डाईव्ह, त्यांना पाण्यात दिसलेले मासे आणि प्रवळ, समुद्रकिनाऱ्यावर घेतलेला वॉक यांसह विविध गोष्टी पाहायला मिळत आहेत. 

दरम्यान आर्या आंबेकरला तिच्या गोड आवाजासाठी ओळखले जाते. तिच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. आर्याला काही दिवसांपूर्वी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील बाई गं या गाण्यासाठी तिला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तिने याबद्दल पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *