Headlines

लायन्स क्लब बार्शी च्या वतीने दडशिंगे गाव घेतले दत्तक

लायन्स क्लब बार्शी चे काम प्रेरणादायी ठरेल – भोजराज निंबाळकर

गावचा सर्वांगिण विकास साधला जाईल — ॲड विकास जाधव

लायन्स क्लब बार्शी च्या वतीने दडशिंगे गाव दत्तक घेतले आहे त्याची घोषणा व्दितिय उप प्रांतपाल M J F भोजराजजी निंबाळकर, माजी प्रांतपाल M J F जितेंद्रजी माढेकर , झोन चेअरमन नंदकुमारजी कल्याणी यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी केली यावेळी भोजराज निंबाळकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच सचिन गोसावी ग्रामसेवक मेघना पाटील, प्रकल्प प्रमुख गिरीशजी शेटे, बापूसाहेब कदम,अक्षय बंडेवार, सचिव संतोष जोशी उपसरपंच विलास पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काकासाहेब काळे, प्रशांत पंडित, दिनेश श्रीश्रीमाळ, जयप्रकाश भराडिया, गोविंद तापडिया, गोवर्धनदास जाजू शिवशंकर ढवण, पंडित मिरगणे पांडूरंग तानाजी घोलप, विकास माने, आलम मुलाणी, काकासाहेब घोलप, पांडुरंग रामकिसन घोलप, मनोज घोलप, समाधान गोसावी, दत्ता घोलप, आर्यन घोलप, ओमराजे गोसावी, भारत काळे, विक्रम घोलप, मंदाकिनी काळे, पुष्पा रांजणकर, सोनाली गोसावी यांच्या सह प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


याप्रसंगी अध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे तेवढे सहकार्य केले जाईल अंगणवाडी,शाळा, स्मशानभूमीची सुशोभीकरण करण्यात येणार असून लोकांना सर्वतोपरी सहकार्य राहील असे यावेळी सांगितले.

दडशिंगे हे गाव दत्तक घेतले त्यासाठी सर्व मदत करु लायन्स क्लबच्या माध्यमातून दडशिंगेहे गाव आदर्श बनेल व्यक्तिगत पातळीवर लोकांना ही सहकार्य करावे असे भोजराज निंबाळकर यांनी सांगितले
ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी व सभासद यांनी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *