Headlines

अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरण: “आज पवारांबद्दल बोललं म्हणून…” संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचं विधान | Nilesh Rane on Abudl Sattar Abusing Supriya Sule mention Sanjay Raut scsg 91

[ad_1]

राज्याचे कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज्यात ठिकठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी आपली भूमिका मांडली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या विधानांची आठवण त्यांनी करुन दिली आहे. संजय राऊतांचा उल्लेख करत महाविकास आघाडीमधील पक्षांवर टीका केली आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “त्यांनी खोके घेतले म्हणून ते खोके देऊ करत आहेत”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली. “इतकी भि***झाली असेल सुप्रिया सुळे, तर तिलाही देऊ”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं.

या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर रान उठवलेलं असताना त्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंनी ही टीका केली आहे. “कुठल्याही महिलेला शिवी घालणं हे कधीच कोण सहन करणार नाही पण संजय राऊत जेव्हां शिव्या घालत होता तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती कोणाला आठवली नाही,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. तसेच राऊत यांनी शिवीगाळ केला तेव्हा त्यांना कोणीही थांबवलं नाही. “एका शब्दाने तेव्हा त्याला महाविकास आघाडीच्या कुठल्याच नेत्यांनी थांबवलं नाही पण आज पवारांबद्दल बोललं म्हणून झोंबलं,” असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.

यापूर्वीच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही संजय राऊतांचा उल्लेख या प्रकरणासंदर्भात बोलताना केला होता. “मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर निवडक नेत्यांविरोधात संताप कितपत योग्य? कंगना रनौत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा”, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

ठप्रत्येक महिलेचा आदर-सन्मान व्हायला हवा. महिलांनीही बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. पुरुषांनी तर सन्मानच केला पाहिजे. पण मी महिला आहे म्हणून मी वाट्टेल ते बोलेन आणि त्याला जर उत्तर आलं तर महिलांची अस्मिता दुखावली गेली असं म्हणत असाल तर ते बरोबर नाही. दोघांनीही एकमेकांचा आदर-सन्मान ठेवायला हवा. उत्तराला प्रत्युत्तर असतं. मागच्या सरकारमध्येही अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाला म्हटलं होतं की ‘मुख्यमंत्र्यांची, मंत्र्यांची गरिमा तुम्ही ठेवायला हवी. भाजपा वाट्टेल तसं बोलते’. तसंच इथेही आहे. तुम्हीही मंत्र्यांची गरिमा ठेवायला हवी. ते मंत्री आहेत. त्यांच्या खात्याशी संबंधित काही असेल तर तुम्ही नक्की बोला. तुम्ही त्यांना जे बोललात, त्याला ते प्रत्युत्तर आलं आहे. अर्थात, या गोष्टीला माझं समर्थन नाही,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

तसेच चित्रा वाघ यांनी, ““गेल्या अडीच वर्षांत काही का केलं नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणं हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *