Headlines

आता तुमचं प्रायव्हेट चॅट राहिल एकदम ‘प्रायव्हेट’, असं लॉक करा WhatsApp

[ad_1]

नवी दिल्ली :Whatsapp trick : व्हॉट्सॲप हे एक असं मेसेजिंग ॲप आहे जे जगात सर्वाधिक वापरलं जातं. म्हणजे नॉर्मल गप्पाटप्पा असो किंवा ऑफिसचं महत्त्वाचं काम असो साऱ्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर होतो. वाढते युजर्स आणि त्यांच्या गरजा यामुळे व्हॉट्सॲपही आपल्या युजर्सना अनेक नवनवीन फीचर्स देत असते. या ॲपमधील सर्व मजकूर, चॅट आणि व्हिडिओ कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर अवलंबून असतात जेणेकरून तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्ही WhatsApp मध्ये जे काही करत आहात ते सेफ असतं.
पण असं असलं तरी आपण आपलं व्हॉट्सॲप आणखी सुरक्षित करु शकतो, त्याला लॉक करुन. कारण अनेकदा आपले मित्र किंवा कोणी ओळखीचं काही कामासाठी आपला फोन घेतं, त्यावेळी व्हॉट्सॲपच्या चॅटशी कोणी छेडछाड करू नये यासाठी आपण व्हॉट्सॲपला लॉक करु शकतो.. तर आज आम्ही तुम्हाला Android आणि iOS मध्ये कशाप्रकारे व्हॉट्सॲप लॉक करु शकता ते सांगणार आहोत…

Android वर WhatsApp कसे लॉक करावे:
1. सर्व प्रथम तुमच्या Android डिव्हाइसवर WhatsApp उघडा.
2. स्क्रीनच्या वरच्या बाजूस उजवीकडे तीन ठिपके असलेल्या मेनूवर टॅप करा. त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
3. नंतर अकाउंट वर टॅप करा.
4. मग प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करा.
5. त्यानंतर तुम्हाला फिंगरप्रिंट लॉक टॅप करावे लागेल.
6. फिंगरप्रिंट लॉक स्क्रीनवर, बटण उजवीकडे स्वाइप करा आणि नंतर फिंगरप्रिंटसह अनलॉक करण्याचा पर्याय चालू करा. तुमच्या फिंगरप्रिंटची पडताळणी करण्यासाठी तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी तुम्ही ज्या फिंगरप्रिंटची नोंदणी केली आहे त्याच फिंगरप्रिंटची तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
7. यानंतर तुम्ही तुमचे अॅप फिंगरप्रिंटने अनलॉक करू शकाल

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

आयफोनवर व्हॉट्सॲप कसे लॉक करावे:
तुम्ही फेस आयडी किंवा टच आयडीने तुमच्या iPhone वर WhatsApp लॉक करू शकता. तुमच्याकडे कोणत्या मॉडेलचा फोन आहे यावर ते अवलंबून आहे. तुमच्याकडे कोणताही आयफोन असेल, तरी स्टेप्स समान आहे.
1. तुमच्या iPhone वर WhatsApp उघडा.
2. स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे सेटिंग्ज टॅप करा.
3. प्रायव्हसीवर टॅप करा.
5. स्क्रीनच्या तळाशी, स्क्रीन लॉक टॅप करा.
6. स्क्रीन लॉकच्या पेजवर तुम्हाला फेस आयडी किंवा टच आयडी निवडणे आवश्यक आहे. हे सुरक्षा फीचर चालू करण्यासाठी, बटण उजवीकडे स्वाइप करा. अशाप्रकारे तुमचं आयफोनमधलं व्हॉट्सॲपही लॉक होईल.

वाचा : Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *