Headlines

ऐन दिवाळीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

[ad_1]

Chandra Mohan Death: संपूर्ण देशात जिथे सगळे दिवाळीचा सण साजरा करत आहेत, चारही दिशांना उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता, कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 9.45 वाजता त्यांचे हैद्राबादनमध्ये असलेल्या जुबली हिल्स परिसरातील एका प्रायव्हेट रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मल्लमपल्ली चंद्र मोहन हे 82 वर्षांचे होते. त्यांना तमिळनाडूमधील अनेक मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत. 

चंद्र मोहन यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे. मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या कुटुंबात आता दोन मुली आहेत. मल्लमपल्ली चंद्र मोहन हे दिग्गज दिग्दर्शक विश्वनाथ यांचे चुलत भाऊ होते. दरम्यान, असे म्हटले जात आहे की मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या पार्थीवावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहे. 

मल्लमपल्ली चंद्र मोहन यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्या निधनावर वेंकटेश दग्गुबाती, नानी, राम चरण आणि साई धरम तेज सारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगुला रत्नम’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी श्रीदेवी, जया प्रदा, जयासुधा सारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम केले आहे. त्यांचा जन्म 23 मे 1943 रोजी आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या कृष्णा जिल्ह्याच्या पमिदिमुक्कुला गावात झाला होता. तर त्यांचं खरं नाव चंद्रशेखर राव मल्लमपल्ली आहे. 

हेही वाचा : ‘थोडी उत्सुकता तर तानूद्या की…’, किरण मानेसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार सातारचा शाहरुख!

लक्षवेधी गोष्ट म्हणजे चंद्र मोहन यांना बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांनी 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पदाहारेला वायसु’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यांना 1987 मध्ये ‘चंदामामा रावे’ चित्रपटासाठी नंदी पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, सगळ्यात शेवटी चंद्र मोहन हे 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऑक्सीजन’ या चित्रपटात त्यांना पाहिलं आहे. याशिवाय त्यांनी ‘7/जी बृंदावन कॉलोनी’ या चित्रपटात हीरोच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *