सुर्डी (ता.बार्शी) – कोरोना च्या संसर्गाचा धडाका कायम आहे. या आजारापासुन सुर्डी गावातील ग्रामस्थ दुर रहावे म्हणून सुर्डीचे सुपुत्र डॉ.सूरज डोईफोडे यांनी जेष्ठ नागरिकांची आणि सर्वांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून कै. फुलाजी लक्ष्मण डोईफोडे (आयुर्वेदिक वैद्य) यांच्या स्मृतीपतीर्थ आर्सेनिक अलब्म ३० या चार हजार गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण मित्र प्रा. मधुकर डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य विनायक डोईफोडे, माजी उपसरपंच मिठू शेळके, रघुनाथ डोईफोडे, जगन्नाथ डोईफोडे यांनी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, यांच्या मार्फत प्रत्येक कुटुंबाला गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाच्या काळात सुरक्षतेची काळजी कशी घ्यायची या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.