मेष : शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्यांशी मतभेद संभवतात.
2. वृषभ : कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल.
3. मिथुन : संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मित्रांशी सुसंवाद साधता येईल.
4. कर्क : तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल. नातेवाईकांची गाठ पडेल.
5. सिंह : व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. अनामिक भीती लागून राहील.
6. कन्या : बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचे योग्य नियोजन करावे.
7. तूळ : प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवास काळजीपूर्वक करावा.
8. वृश्चिक : प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्यांशी मतभेद होण्याची शक्यता.
9. धनु : घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल. जुनी येणी प्राप्त होतील.
10. मकर : भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल. वैवाहिक जीवन उत्तम राहील.
11. कुंभ : मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुलभ असेल.
12. मीन : बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल. आरोग्याची काळजी घ्यावी.