Headlines

कारी येथे सोयाबीनच्या ११७ कट्ट्यांची चोरी

कारी / प्रतिनिधी – शेतातील बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून पत्र्याच्या शेड मधील सोयाबीनचे तब्बल११७ कट्टे चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात घडला.

प्रभाकर महादेव गादेकर (वय४५) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी हे रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गट नंबर ७६३ मधील पत्र्याच्या शेड मधील खोलीत १२० कट्टे सोयाबीन ठेऊन खोलीला कुलूप लावून , गावातील राहते घरी निघून गेले.

त्यानंतर सकाळी ६ वाजता शेतात काम करणारा शेतगडी आणि फिर्यादी शेतामध्ये आले असता त्यांना पत्र्याच्या शेडमधील खोलीचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी खोलीमध्ये जाऊन पाहिले असता पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले सोयाबीनच्या १२० कटयापैकी ३ कट्टे मिळून आले. बाकीचे ११७ कट्टे दिसले नाहीत.

बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोयाबीनचे कट्टे चोरल्याबाबत अज्ञात आरोपींविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६५ किलो वजनाचे प्रत्येकी एका कट्ट्याची किंमत ३९०० रू दराने ११७ कट्ट्याचे ४ लाख ५६ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *