Headlines

मनोरुग्णांची सेवा करणार्‍या आतिश चा सन्मान


सोलापूर/विशेष प्रतींनिधी – सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते  संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण सिरसट यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

सोलापूर शहरामध्ये बेवारस अवस्थेत असणाऱ्या मनोरुग्णांना भेटल्यावर येणाऱ्या अस्वस्थतेमधून आतिष कविता लक्ष्मण सिरसट यांनी एका मनोरुग्ण महिलेला तीच्या घरी पोहोचण्यास मदत केली.या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून बेवारस व घरातून बाहेर पडून भटकणाऱ्या मनोरुग्णांनाच पुनर्वसन केलं आहे.

त्यातील रुग्णांना हक्काचा निवारा मिळवून देण्यास यश आले आहे. या उल्लेखनीय कार्यासाठी सोलापूर महानगर पालिके कडून सन्मान पत्र व मान चिन्ह देऊन ,सोमपा आयुक्त पी.शिवशंकर,महापौर कांचना यन्नम , खासदार जयसिद्धेश्वर स्वामी,आमदार सुभाष देशमुख ,सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्या हस्ते सन्मानित करून  गौरविण्यात आले.यासोबत वृद्ध व आजारी व्यक्तींना देखील मदत करण्यासाठी संभव फाऊंडेशन  मार्फत प्रयत्न केले जातात.

समाजातील शेवटचा घटक मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे.आरोग्य राखण्याच्या मुलभूत व प्राथमिक हक्कांपासून कुणीही वंचित राहु नये या तळमळीने आतिश कविता लक्ष्मण सिरसटने संभव फाऊंडेशनची स्थापना करून हे कार्य अविरत सुरू ठेवले. विद्यार्थ्यांमध्ये,युवकांमध्ये मानसिक आजारासंदर्भात तसेच मनोरुग्णांसदर्भात भरपूर गैरसमज आहेत व यामुळे माणसा-सारखा माणूस असून देखील मनोरुग्ण आजही वंचितच राहत आहेत हे चित्र बदलणे गरजेचे आहे.हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर  ठेवून संभव फाऊंडेशन कार्य करीत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *