[ad_1]
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज सकाळी ७ वाजता ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. दरम्यान या कारवाईवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी असून इंदिरा गांधी यांनी एकवेळ आणीबाणी लावली होती. त्याहीपेक्षा हे भयंकर आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
हेही वाचा – ED at Sanjay Raut’s Home Live : “कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी माझ्या घरात घुसले”; संजय राऊतांचा आरोप
”संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी आहे. एक आणीबाणी इंदिरा गांधी यांनी लावली होती. ही त्याहीपेक्षा हे भयंकर आहे. खरं तर हे भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र, शिवसेना संपणार नाही, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
हेही वाचा – ९ तासांच्या छापेमारीत ईडीने काय केले? संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी नेमके सांगितले, म्हणाले…
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. तत्पूर्वी त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणत्याही परिस्थिती संजय राऊत यांना येथून जाऊ देणार नाही, असा पावित्रा घेल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
[ad_2]