[ad_1]
वाचा: Budget Smartphones: Samsung ते Realme…२० हजारांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन्स
गुगलने काही दिवसांपूर्वीच युट्यूब यूजर्ससाठी नवीन अपडेट जारी केले आहे. जे सध्या केवळ अँड्राइड टीव्ही, गुगल टीव्हीवर काम करते. कंपनीने अपडेट युट्यूब अॅप जारी केले आहे, ज्याद्वारे यूजर्स स्मार्ट टीव्हीवर युट्यूबमध्ये लॉग इन करू शकतात. युट्यूब टीव्हीवर तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून लॉगइन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, दोन्हीही डिव्हाइस वाय-फायशी कनेक्ट असणे गरजेचे आहे. याआधी यूजर्सला टीव्ही आणि रिमोटच्या माध्यमातून पासवर्डला मॅन्यूअली भरावे लागत असे, यामुळे समस्या येत होती. परंतु, आता अपडेटमुळे ही समस्या दूर झाली आहे.
वाचा: Budget Smartphones: Samsung ते Realme…२० हजारांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन्स
ही प्रोसेस वापरून स्मार्ट टीव्हीवर लॉग इन करा युट्यूब
- सर्वात प्रथम तुमच्या टीव्हीवर युट्यूब अॅप ओपन करा. त्यानंतर साइन इन फोन पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा स्मार्टफोन आणि टीव्हीवरील युट्यूब अॅप अपडेट असणे गरजेचे आहे.
- टीव्हीवरील अॅप तुम्हाला स्मार्टफोनमध्ये युट्यूब अॅप उघडण्याची परवानगी देईल.
- एकदा स्मार्टफोनमध्ये अॅप ओपन केल्यानंतर यूट्यूब टीव्ही अॅपमध्ये आपोआप लिंक असलेले अकाउंट लॉग इन होईल.
- या प्रोसेसनुसार तुम्ही स्मार्ट टीव्हीवर आपल्या प्लेलिस्ट, सेव्ह केलेल्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.
वाचा: Flipkart Sale: लिस्ट तयार करा! फ्लिपकार्टवर पुन्हा सुरू झाला खास सेल, महागड्या स्मार्टफोन्ससह अनेक वस्तू स्वस्तात करता येईल खरेदी
[ad_2]