Headlines

बलात्काराचा आरोप, ‘AU’चे 44 फोन, आदित्य ठाकरे कनेक्शन अन्..; दिशा सालियन प्रकरण काय?

[ad_1]

What Is The Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार आता एसआयटीकडून आदित्य यांची चौकशी होणार आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

दिशा सालियन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

2020 मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला.

बलात्कार करून हत्येचा आरोप

नारायण राणेंनी 2022 मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणेंना समन्सही बजावलं होतं. दोघांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. नितेश राणेंनीही वेळोवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आदित्य ठाकरे कुठे होते? या प्रकरणाशी त्यांचं काय कनेक्शन आहे अशापद्धतीचे प्रश्न विचारले होते.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढला

बऱ्याच वादानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर केलेला. दिशा सालियन प्रकरणामुळे 2021 आणि 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले. मात्र, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला होता. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट करण्यात आलेलं. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले होते.

सीबीआयने अहवालात नेमकं काय म्हटलं?

सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि 14 व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यानं मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिलाही. मात्र आता याची एसआयटी मार्फत पुन्हा तपास केला जाणार आहे.

6 दिवसांमध्येच सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू

दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत हा त्याच्या वांद्रे येथील त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नंतर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडीमार्फत) चौकशी सुरू आहे. रिया अमलीपदार्थाचे सेवन करत होती आणि तिने ते सुशांतलाही ड्रग्जचं व्यसन लावल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केलेला. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने केला.

‘AU’ क्रमांकावरुन 44 फोन कॉल

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘AU’ नावाने सेव्ह केलेल्या क्रमांकावरुन 44 फोन कॉल आले होते. ‘AU’ चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे, असा आहे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत मुद्दा उपस्थित चौकशीची मागणी केली होती. 22 डिसेंबर रोजी फडणवीस यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *