मेष : काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.
मिथुन : कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका.
4. कर्क : नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या.
5. सिंह : दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल.
कन्या : घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.
तूळ : व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात.
वृश्चिक : नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल.
धनु : आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल.
मकर : गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस.
कुंभ : काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी.
मीन : स्पर्धेत यश मिळवाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा.