Headlines

पहिल्याच चित्रपटात स्टार किड्सनं ओलांडल्या मर्यादा! The Archies मधल्या लिप लॉकचीच चर्चा

[ad_1]

Suhana Khan, Agasty Nandaand Khushi Kapoor : बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिक जोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून किंग खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर हे तिघेही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात त्यांचा अभिनय पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना या तिघांचे असे काही सीन्स पाहायला मिळाले जे पाहून त्यांना आश्चर्य झाले. त्यांचे चित्रपटातील हे सीन्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

‘द आर्चीज’ या चित्रपटात सुहाना खाननं फक्त अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला आणि खुशी कपूरनं देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहे. पहिल्याच चित्रपटात शाहरुखच्या लेकीनं अगस्त्यसोबत लिपलॉक केला आहे. त्या दोघांमध्ये असलेली रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय खुशी कपूरनं देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटात खुशी ही अगस्त्य नंदाची बेस्ट फ्रेंड म्हणजेच आर्चीची जवळची मैत्रिण बेटीची भूमिका साकारत आहे. बेटीला तो खूप आवडत असतो. चित्रपटात फक्त सुहानानं नाही तर खुशी कपूरनं देखील अगस्त्य नंदासोबत लिपलॉक सीन दिला आहे. या सीन्सचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

star kids Suhana Khan Agasty Nandaand and Khushi Kapoor lip lock scene in The Archies

सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूरशिवाय अदिती सहगल, युवराज मेंडा, मिहिर आहूजा, मिहिर आहूजा आणि वेदांग रैना देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले होतं. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकार दिसले होते. 

हेही वाचा : Fighter Teaser: श्वास रोखून धरायला लावणारा, ॲक्शनने भरलेल्या हृतिक-दीपिकाच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘द आर्चीज’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या प्रदर्शनाआधी पासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सगळेच चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. दरम्यान, या चित्रपटामुळे सुहाना आणि अगस्त्य या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात ‘द आर्चीज’ च्या संपूर्ण टीमसोबत मिळून सुहानानं अगस्त्यचा वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात सुरु झाल्या. मात्र, त्या दोघांनी या त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *