Headlines

‘या’ व्यक्तीला जान्हवी कपूर करतेय डेट? फोटो आले समोर!

[ad_1]

Janhvi Kapoor Dating Life : बॉलीवूडमध्ये, स्टार्स त्यांच्या चित्रपटांसोबतच डेटिंग, ब्रेकअप, लग्न आणि घटस्फोटामुळे खूप चर्चेत असतात. सध्या जान्हवी कपूरचं नावही खूप चर्चेत आहे. ओरहान अवत्रामणीच्या नुकत्याच झालेल्या हॅलोवीन पार्टीनंतर जान्हवी कपूर त्याला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. या पार्टीत दोघंही एकत्र दिसले होते. याआधी त्यांची झलक दिवाळी पार्टीतूनही पाहायला मिळाली होती. अशा परिस्थितीत, अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफमुळे कधीपासून चर्चेत आली हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ईशान खट्टरसोबत जोडले गेलं होतं नाव
जान्हवी कपूरच्या ‘धडक’ या डेब्यू चित्रपटाच्या लॉन्चिंगदरम्यान, अभिनेत्री या चित्रपटातील तिचा सहकलाकार ईशान खट्टरला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, या वृत्तांवर दोघांनीही काहीही सांगितलं नाही. नंतर बातमी आली की, दोघं वेगळे झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही आता एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

जिवलग मित्र अक्षतसोबतही नाव जोडलं गेलं
2018 मध्ये, जान्हवी कपूर तिचा चांगला मित्र अक्षत रंजनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. मात्र, जान्हवीने अनेकदा स्पष्ट केलं की अक्षत तिचा चांगला मित्र आहे त्यांच्यात अजून काही नाही.

शिखर पहारियासोबत रिलेशनशिपमध्ये होती जान्हवी!
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असल्याचं करण जोहरच्या चॅट शोमध्ये उघड झालं होतं. जान्हवीसोबतच सारा अली खानच्या कथित बॉयफ्रेंडचं नावही समोर आलं होतं, ज्याच्याबद्दल करण जोहरने सांगितलं की, ती शिखरचा भाऊ वीर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

जेव्हा बहीण खुशीचं नाव जान्हवीच्या एक्ससोबत जोडलं गेलं होतं!
काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, जान्हवीची बहीण खुशी कपूर देखील अक्षत रंजनला डेट करत आहे. ज्याच्यासोबत जान्हवीचं नाव कधी जोडलं गेलं होतं. मात्र, एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने स्पष्ट केलं होतं की, दोन्ही बहिणींनी त्याला कधी डेट केलं नाही. लहानपणापासून तो त्यांचा चांगला मित्र आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *