Headlines

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं Sajid Khan वर केला लैंगिक छळाचा आरोप, म्हणाली ‘मी ऑफिसमध्ये गेल्यापासून तो मला…’

[ad_1]

Jayshree Gaikwad Accused Sajid Khan of Sexual Harassment : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी साजिदवर काही अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे #MeToo चे आरोप केले. तेव्हापासून चित्रपटसृष्टीमुळे लांब असलेला साजिद सध्या एका शोचा भाग आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  साजिदवर आरोप करणाऱ्यांमध्ये या बॉलिवूड अभिनेत्रींचे देखील नाव आहे. त्यामुळे बिग बॉसमधून बाहेर काढण्याचीही मागणी करण्यात आली होती. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं साजिद खानवर गंभीर आरोप केले. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या साजिदवर नेटकरी संतापले आहेत. सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांनी त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. 

साजिद खानवर आरोप करणारी मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड आहे. जयश्रीनं साजिदवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. साजिद सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘आठ वर्षांपूर्वी एक लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शक मला एका पार्टीत घेऊन गेला. त्यावेळी माझी साजिद खानशी भेट झाली. त्यावेळी त्याला भेटून मला आनंद झाला.’ 

जयश्री पुढे म्हणाली,’ दुसऱ्या दिवशी लगेचच साजिदनं मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यानं सांगितलं की तो एक सिनेमा बनवतोय आणि त्यात मला तो मुख्य भूमिका देणार आहे. पण ऑफिसमध्ये जेव्हा मी पोहोचले होते तेव्हापासून तो सतत मला स्पर्श करत होता. इतकंच काय तर त्यानं अश्लील कमेंटही केल्या. तेव्हा मला साजिदनं सांगितलं होतं की फक्त अभिनय करून चालत नाही. मी जे काही सांगेन ते तुला करावं लागेल. तेव्हा रागात मी त्याच्या ऑफिसमधून निघून गेले.’

साजिदवर जयश्री आधी मॉडेल आणि अभिनेत्री शीला प्रिया सेठनं देखील आरोप केले होते. ‘साजिद खानसोबत माझी पहिली भेट 2008 मध्ये झाली होती. त्यावेळी मी त्याला त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मला कास्ट करण्याची विनंती केली. मला वाटले की साजिद एक उत्तम दिग्दर्शक आहे आणि तो मला मदत करू शकतो. मात्र, यानंतर साजिद खान काय म्हणाला आणि काय केले याची कल्पनाही करू शकत नाही.

हेही वाचा : लग्नाच्या पहिल्याच दिवशी पत्नी गौरीला सोडून ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला भेटायला गेला होता Shahrukh Khan

अभिनेत्री म्हणते, ‘साजिद खानशी बोलत असताना तो जवळपास ५ मिनिटे माझ्या प्रायव्हेट पार्टकडे पाहत राहिला. मला अस्वस्थ वाटत होते. यानंतर तो म्हणाला की, तुमची शस्त्रक्रिया करून घ्या कारण तुमचे स्तन बॉलिवूडसाठी पुरेसे मोठे नाहीत. साजिद खानच्या तोंडून असं ऐकून मी थक्क झालो. मात्र, तो इथेच थांबला नाही, तर तो म्हणाला की, माझे स्तन मोठे करण्यासाठी मी रोज काही तेलाने मसाज करायला हवा.

फक्त या दोन अभिनेत्री नाही तर त्या अभिनेत्रींमध्ये 10 पेक्षा जास्त अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रींच्या यादीत डिंपल पॉल, अभिनेत्री आहाना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी त्याची एक्स असिस्टंट सलोनी चोप्रा अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *