Headlines

World Cup जिंकायचाय, पण KL Rahul ची बॅट चालेना, कॅप्टन रोहितसमोर दोनच पर्याय!

[ad_1]

KL Rahul Form: टी-ट्वेंटी वर्ल्ड (T20 World Cup) कपमधील टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास हा चांगला राहिलाय. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने टीम इंडियाने खिश्यात घातले आहेत. तर साऊथ अफ्रिकेविरुद्ध (Ind VS Sa) देखील भारताने जोरदार टक्कर दिली. मात्र, भारताला हा सामना जिंकता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या ओव्हरपर्यंत सामना फिरवला होता. मात्र, या सामन्यात एका खेळाडूने रोहित शर्माची (Rohit Sharma) डोकेदुखी वाढवली आहे.

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल (KL Rahul) आशिया कपपासून फॉर्ममध्ये नाही. सात्त्याने के एल राहुलला फ्लॉप शो पहायला मिळतोय. आशिया कपनंतर आता वर्ल्ड कपमध्ये देखील के एल राहुलला फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळे कॅप्टन रोहित आता टेन्शनमध्ये आलाय. राहुल हा टीम इंडियाचा उपकर्णधार देखील आहे.

आतापर्यंतच्या 3 सामन्यांमध्ये राहुलला 23 धावाच करता आल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध 5, नेदरलँड विरुद्ध 9, तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 9 असा फ्लॉप शो राहुलचा राहिला आहे. त्यामुळे आता रोहित शर्मापुढे आता दोनच पर्याय आहेत.

राहुल हा सलामीवीर असल्याने सध्या भारताकडे दुसरा पर्याय नाही. राखीव खेळाडूंमध्ये एकही सलामीवीर फलंदाज नाही. त्यामुळे विराट कोहलीला (Virat Kohli) ओपनिंगसाठी उतरावं लागेल. तर दुसरा पर्याय हा रिषभ पंतचा (Rishabh Pant) असू शकतो. रिषभ पंत देखील मैदानात कमाल दाखवू शकतो. रिषभ आणि राहुल उतरल्यास लेफ्ट आणि राईट हँड कॉम्बिनेशन देखील पहायला मिळेल. त्यामुळे रिषभ पंत ओपनिंग करेल का? असा सवाल उपस्थित होतो.

आणखी वाचा – अद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय…! T20 World Cup मधील सर्वांत भन्नाट कॅच, पाहा Video

दरम्यान, विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. पाकिस्तानविरुद्ध वादळी पारी खेळत त्याने विराट विजय मिळवून दिला. विराट आयपीएलमध्ये बंगलुरूकडून खेळताना ओपनिंग देखील केली आहे. त्यामुळे आता विराट ओपनिंग करणार का? कोच कोणता निर्णय घेतील?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *