Headlines

‘डेटवर गेल्यानंतर बिल पे करणाऱ्या मुली मूर्ख!’ डेटिंगबाबत जया बच्चन यांचा महिलांना सल्ला

[ad_1]

Jaya Bachchan : नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टचा एक नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या पॉडकास्टमध्ये नव्या ही महिलांसंबंधीत काही गोष्टींवर यावेळी डिस्कस करताना दिसते. या शोमध्ये आपल्याला नेहमी जया बच्चन आणि श्वेता बच्चन दिसतात. मात्र, यावेळी नव्या नवेली नंदानं पुरुष काय विचार करतात याविषयी जाणून घेण्यासाठी यावेळी भाऊ अगस्त्य नंदाला देखील शोमध्ये बोलावलं होतं. त्याच्याशी या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. 

या एपिसोडमध्ये अशा सगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली की कशाप्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषत्वावर असलेले विचार बदललेले आहेत. नव्यानं सांगितलं की तिचा भाऊ अगस्त्य हा खूप सेंसेटिव्ह व्यक्ती आहे आणि त्याला जर रडायचं असेल तर तो सगळ्यांसमोर रडतो. तर काही दिवसांपासून चित्रपटांमध्ये पुरुषांची वागणूक ही फार टॉक्सिक असल्याचे दाखवण्यात आले. त्यावरून चर्चा सुरु होती तर नव्या पॉडकास्टमध्ये त्यांचा हाच मुद्दा होता. अगस्त्यनं म्हटलं की प्रत्येक कामामागील हेतू खूप महत्त्वाचा असतो. कारण जर पुरुषानं चांगल्या भावनानं स्त्रियांसाठी दार उघडे ठेवले तर ते मान्य आहे, पण स्वत: ला महान समजून काही केलं तर ते चुकीचं आणि त्रासदायक ठरू शकतं. 

नव्या म्हणाली, “फेमिनिजम विषयी महिलांना आता सशक्त असल्याची जाणीव होते, अनेक गोष्टी या स्वतंत्र्यपणे त्यांना करायच्या आहेत. जसं आज जर तुम्ही कोणत्या मुलीला डेटवर घेऊन जातात आणि ती बिल भरण्याविषयी बोलते तेव्हा काही लोकांना हे पटत नाही. कारण महिलांना वाटतं की त्या देखील समान आहेत.” नव्यानं केलेलं हे वक्तव्य ऐकताच जया बच्चन म्हणाल्या, “त्या महिला किती मुर्ख असतात, तुम्ही पुरुषांना पैसे भरू द्यायला हवे.”

हेही वाचा : रकुल आणि जॅकीच्या प्री-वेडिंग पासून लग्नापर्यंतचा व्हिडीओ आला समोर

हे ऐकताच नव्यानं तिची आई आणि आजीला विचारलं की त्यांना आता पुरुषांच्या स्वभावात काही फरक जाणवतो? श्वेतानं उत्तर देत सांगितलं की “ही गोष्ट सुरुवातीपासून आहे की एखाद्या व्यक्तीला स्ट्रॉंग आणि शांत राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहात, तरी तुम्ही त्या मुलाची प्रतिक्षा करत असता की तो तुमच्याजवळ येईल. तुम्ही वाट पाहता की तो येईल आणि प्रपोज करेल.” त्यानंतर जया बच्चन म्हणाल्या, “मला हे आवडतं, एखादा पुरुष प्रपोज करतो ही एक चांगली गोष्ट आहे, मला फार वेगळं वाटतं.” दरम्यान, या आधी देखील जया बच्चन यांनी रिलेशनशिप्सवर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय नात्यात असलेल्या रेड फ्लॅग्सविषयी देखील सांगितलं होतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *