Headlines

‘पुढच्या 3 वर्षात मी हॉलिवूडमधील चित्रपटाचं दिग्दर्शन करेन’; ‘या’ भारतीय दिग्दर्शकाने व्यक्त केला विश्वास

[ad_1]

Atlee Hollywood Movie : 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटानं मोठे रेकॉर्ड केले. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटानं धमाकेदार कमाई देखील केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली कुमारनं केलं. अ‍ॅटलीनं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जवळपास 8 वर्ष प्रतिक्षा केल्यानंतर अ‍ॅटलीला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हिंसाचार आणि संवेदनशील आशयावर अ‍ॅटलीनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅटलीनं सांगितलं की “मीडिया हिंसाचार असलेले फोटो आणि व्हिडीओ वापरतात. तर हे आजच्या जगाचं एक सत्य आहे. जेव्हा कोणत्याही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचे कळते तेव्हा तो सीन त्यांना दाखवायचा आहे असं आधीच ठरलं असेल तर तो  न दाखवण्याचा पर्याय त्यांच्याकडे राहतच नाही. त्यानं पुढे सांगितलं की वृत्तपत्रात दाखवण्यात आलेल्या हिंसाच्या बातम्या सोडून पुढे जाण्याचा पर्याय इतरांकडे असतो, पण जनतेचा आवाज बनून त्यांना प्रभाव टाकायचा असतो.”

अ‍ॅटलीनं म्हटलं की “कोणत्याही चित्रपटात हिंसा कोणालाही भडकवण्यासाठी दाखवली जात नाही, तर लोकांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते की जे झालं त्यातील काही गोष्टी मानवतेच्या होत्या की अमानवीय होत्या. जर एखाद्या बातमीत श्वानाला गोळी मारली जात असल्याचं दाखवलं तर ते हिंसेला प्रोत्साहन देत नाही परंतु अमानुष वागणूक आणि प्राण्यांवरील हिंसाचाराबद्दल प्रश्न उपस्थित करते. थोडक्यात हे सर्व सत्य समोर आणण्यासाठी केले जाते.” 

या वेळी अ‍ॅटलीनं हे देखील सांगितलं की “त्याला हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूडमध्ये येण्यासाठी 8 वर्ष लागली. पण त्याचसोबत पुढच्या तीन वर्षात हॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्याचं वचनही त्यानं दिले.” 

पुढे रजनीकांत यांच्याविषयी शूटिंगच्या पहिल्या दिवसाविषयी सांगत अ‍ॅटली म्हणाला, “एक चांगला अनुभव होता. ॲटली यांनी दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत रोबोटमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. दिग्दर्शक म्हणून त्यानं थलपती विजय आणि शाहरुख यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत चित्रपट केले आहेत.” 

हेही वाचा : समांथाचा एकांत! ‘या’ ठिकाणी घालवला Me Time!

दरम्यान, एका मुलाखतीत अ‍ॅटलीनं शाहरुखसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ते दोघं पुन्हा कधी एकत्र येणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *