Headlines

‘तू नट म्हणून…’, लाडक्या अभिनेत्याला हे काय म्हणाले प्रवीण तरडे?

[ad_1]

Pravin Tarde Prasad Oak Birthday Post : सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. प्रसाद ओक हा धर्मवीर या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. प्रसादने या चित्रपटात ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. प्रसादने अभिनयासोबतच दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसाद ओक हा आज त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे हे कायमच चर्चेत असतात. प्रवीण तरडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रसाद ओकसोबतचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना प्रवीण तरडेंनी प्रसादला शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रविण तरडेंची पोस्ट

“लाडक्या अभिनेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तु नट म्हणुन उत्तम आहेसच पण माणुस म्हणुन अतिउत्तम आहेस”, अशा शब्दात प्रवीण तरडेंनी प्रसादला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रवीण तरडेंच्या या पोस्टवर प्रसाद ओकने कमेंट केली आहे. प्रसादने मन:पूर्वक आभार मित्रा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रसाद ओक आणि प्रवीण तरडे यांची खास मैत्री आहे. प्रवीण तरडे यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात प्रसाद ओक हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत झळकला होता. त्याच्या या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. या चित्रपटामुळे प्रसाद आणि प्रवीण याचं मैत्रीपलीकडंच घट्ट नातं निर्माण झाले.

हेही वाचा : रवीना टंडनच्या वडिलांच्या नावे मुंबईत चौक, पालिकेने का गौरवलं? जाणून घ्या

दरम्यान प्रसाद ओक हा लवकरच ‘धर्मवीर 2’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याबरोबरच तो ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ यासारख्या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *