Headlines

‘तुझी क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण?’ अंजिक्य राऊत म्हणाला, ‘माझी नवीन…’

[ad_1]

Ajinkya Raut Girlfriend : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून अजिंक्य राऊतला ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून तो कायमच प्रसिद्धीझोतात असतो. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे अजिंक्य राऊत घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने इंद्रा हे पात्र साकारले होते. सध्या अजिंक्य हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत झळकत आहे. त्याबरोबरच तो ‘कन्नी’ चित्रपटामुळेही चर्चेत आहे. आता नुकतंच अजिंक्यने त्याच्या क्रशबद्दल खुलासा केला आहे. 

अजिंक्य राऊत हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता अजिंक्यने त्याच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर आस्क मी सेशन आयोजित केले होते. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर दिले. 

अजिंक्य राऊतचे हटके उत्तर

यावेळी एका चाहत्याने त्याला ‘तुझी सध्याची क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजिंक्यने फारच दिलखुलासपणे उत्तर दिले. “माझी नवीन गाडी. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात फार आनंदात आहोत”, असे अजिंक्यने म्हटले आहे.

ajinkya raut

अजिंक्यने काही दिवसांपूर्वीच नवी कोरी कार खरेदी केली. अंजिक्यच्या या नव्या कारचा रंग निळा आहे. त्याने काही दिवसांपूर्वी याचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. या फोटोत तो आणि त्याची नवीन कार दिसत होती. त्याच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. 

लवकरच झळकणार ‘कन्नी’ चित्रपटात

दरम्यान, अजिंक्य राऊत हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो लवकरच कन्नी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. येत्या 8 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टर आणि गाण्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

अजिंक्यने ‘विठू माऊली’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने श्री विठ्ठलाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो मन उडू उडू झालं या मालिकेत झळकला. यात त्याने साकारलेली इंद्रा ही भूमिका प्रचंड गाजली. त्याबरोबरच टकाटक, टकाटक 2 या चित्रपटातही त्याने काम केले आहे. सध्या तो ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’मध्ये झळकत आहे.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *