Headlines

कोण आहे दगडूच्या खऱ्या आयुष्यातील प्राजू? तुम्ही पाहिली का प्रथमेशची गर्लफ्रेंड?

[ad_1]

मुंबई : ‘आई बाबा आणि साईबाबाची शपथ, अरे आपण गरीब हुए तो क्या, दिल से हम अमीर है अमीर’, अशा एकाहून एक पैसा वसूल डायलॉगमुळे प्राजूचा दगडू लोकप्रिय झाला होता.  प्रथमेश परब ने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.  टकाटक आणि टाइमपास मध्ये मुख्य पात्राची भूमिका करण्यापूर्वी त्याने बालक-पालक  मध्ये एक छोटीशी भूमिका  साकारली होती. नेहमीच हा अभिनेता कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच.

नुकताच हा अभिनेता त्याच्या एका पोस्टमुळे जबरदस्त चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर दगडूने त्याचे काही फोटो  शेअर केले आहेत. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या फोटोत त्याच्या सोबत त्याची गर्लफ्रेंड दिसत आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन दिलं आहे की, ‘तेरे सारे रंग ओढ़ के ढंग ओढ़ के… तेरा हुआ मैं सबको छोड़ के हो….’ त्याच्या या फोटोवर त्याचे चाहते लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी अभिनेत्याच्या या पोस्टवर हार्ट ईमोजी शेअर केले आहेत.

तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीयामधून या पोस्टवर या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलंय की, Congratulations both of you तर अजून एकाने म्हटलंय, खुप छान जोडी तर अजून एकजण म्हणतोय, लग्न कधी मग भाऊ तर अजून एकाने लिहीलंय, रब ने बना दी जोडी. तर अजून एकाने लिहीलंय,  प्राजू भेटली ?? अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते अभिनेत्याच्या पोस्टवर करत आहेत. 

अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. असं म्हटलं जातंय. ‘टाइमपास’  (Time pass) या चित्रपटातील दगडू म्हणजे प्रथमेश परबला (Prathamesh Parab ) रिअल लाइफमधील प्राजू मिळाली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे Romance करतानाचे फोटो तुफान व्हायरल होतं आहे. टाइमपास या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला दगडूवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावर होतं आहे. 

गेल्यावर्षी दिवळीला प्रथमेशने त्याच्या नात्याची घोषणा केली होती. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले होते. आताही त्याने गणेशोत्सवानिमित्त छानसं फोटोशूट केलं आहे. त्यात ते दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत. तिने अबोली रंगाचे कपडे परिधान केले आहेत तर त्याने मोती रंगाचा कुर्ता घातला आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *