Headlines

कोण कुठला अक्षय कुमार? लग्नानंतर असं का म्हणते Twinkle Khanna

[ad_1]

Twinkle Khanna Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची मुलगी ट्विंकल खन्ना ही फक्त एक अभिनेत्रीच नाही तर लेखिका देखील आहे. ट्विंकलचा आज 48 वा वाढदिवस आहे. ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या विषयी काही खासी गोष्टी जाणून घेऊया… ट्विंकलनं एका मुलाखतीत तिच्या आणि पती अक्षयच्या (Akshay Kumar) लग्नाची ज्योतिषीने केलेल्या भविष्यवाणी विषयी सांगितले. एवढचं काय तर जेव्हा ही भविष्यवाणी करण्यात आली होती, तेव्हा अक्षय कोण आहे हे देखील तिला माहित नव्हतं.

ट्विंकलने तिचा ‘ट्विक इंडिया’ या शोमध्ये तिनं हा खुलासा केला होता. भविष्यवाणी विषयी बोलत असताना ट्विंकलने सांगितले की तिचे वडील म्हणजे राजेश खन्ना यांना देखील एका ज्योतिषीनं माझ्या लग्नाची भविष्यवाणी सांगितली होती. “माझा ज्योतिषीवर विश्वास नाही पण माझे वडील त्यांच्या ओळखीचे एक ज्योतिषी होते आणि त्यांनी माझ्या लग्ना आधीच माझा पती कोण होणार याची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की तू अक्षय कुमारशी लग्न करशील. मी म्हणाली कोण? त्याच पूर्ण नाव काय आहे. त्यावेळी तर मी अक्षयला ओळखत सुद्धा नव्हते”, असं ट्विंकल म्हणाली.

हेही वाचा : ‘हा माझ्यासाठी Extra Special…’, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik ची ‘ती’ खास पोस्ट

याविषयी सविस्तर सांगत ट्विंकल म्हणाली, “लग्नाच्या काही वर्षांनंतर माझे वडील त्या ज्योतिषीला माझ्या घरी घेऊन आले. मी कोणाला असे काही प्रश्न विचारत नाही असं म्हणतं म्हणाले, मी व्यवसाय करेल का? आणि त्यावर ते म्हणाले, ‘तू लेखिका होशील आणि मी 20 वर्षे काहीही लिहिले नव्हते. त्यावेळी मी त्या ज्योतिषीशी माझ्या डेकोरेशनच्या बिझनेसविषयी विचारत होते. तर ते मला दुसऱ्याच गोष्टीविषयी सांगत होते. इतकंच काय तर मी लेखिका होईल काहीही… अशी माझी त्यावेळी रिअॅक्शन होती आणि आता…” 

ट्विंकल खन्नानं 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. ट्विंकलला तिच्या या चित्रपटासाठी फिल्मफेअर डेब्यूचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ट्विंकलनं तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाही. ‘जान’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘उफ्फ ये मोहब्बत’, ‘इतिहास’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘जुल्मी’, ‘बादशाह’, ‘मेला’, ‘चल मेरे भाई’, ‘जोरू का गुलाम’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटांमध्ये ती दिसली. तर तिच्या लेखिका म्हणून करिअरविषयी बोलायचं झालं तर तिनं आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली आहेत. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘पायजामा इज फॉरगिव्हिंग’.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *