Headlines

कुठे गायब आहे अभिनेत्री प्राची देसाई? प्रेमात मिळाला धोका

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईने लोकप्रिय टीव्ही शो ‘कसम से’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. शोमधील ‘बानी’ या व्यक्तिरेखेने ती घराघरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर प्राचीने ‘रॉक ऑन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. गेल्या काही वर्षांत प्राचीने ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘रॉक ऑन 2’, ‘अजहर’, ‘मी, मी और मैं’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला कधीच यश मिळवता आलं नाही.  

प्राची देसाईने जेव्हापासून इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं तेव्हापासून ती आपल्या मनात घर करून आहे. अभिनेत्री अनेकांच्या हृदयांवर राज्य करते, मात्र तिच्या वैयक्तिक जीवनात ती अविवाहित आहे.३५ वर्षीय प्राचीला तिचे वैयक्तिक आयुष्य गुपित ठेवणं आवडतं. हे काही नवीन नाही. मात्र, एका मुलाखतीत प्राचीने एका प्रसंगाचा उल्लेख केला होता जेव्हा तिच्या पार्टनरने तिची फसवणूक केली होती. ‘फिल्मफेअर’शी झालेल्या संभाषणात प्राची देसाईने तिच्या भूतकाळातील नातेसंबंधातील एक प्रसंगाविषयी सांगितलं आहे.  आणि ती एका पुरुषाच्या प्रेमात कशी वेडी होती हे उघड केलं.

अभिनेत्रीने सांगितलं होतं की, केले होते की, ती ज्या व्यक्तीला डेट करत होती त्याने तिला सांगितलं की, तो वेगळ्या देशात आहे यानंतर ‘मी माझ्यासाठी तरी अनेक देश फिरले आहे. मी त्याच्याशी फोनवर बोलयाचे तेव्हा तो म्हणाला की तो एका खास देशात आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला सरप्राईज देण्यासाठी तिथे गेले. पण तिथे पोहचल्यावर तो खोटं बोलल्याचं लक्षात आलं. तो तिथे नव्हता! मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि मी एकट्याने सुट्टी एन्जॉय केली.

‘ईटाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्राची देसाईने लग्नाविषयी मोकळेपणाने सांगितलं आणि तिला तिच्या आयुष्यात कोणता जोडीदार हवा आहे, असं विचारण्यात आलं. यावंर अभिनेत्री म्हणाली की, तिला लग्न करायचं नाही.  आणि जर तिला  कोणीतरी खास सापडलं तर तिला लग्न करण्यास काहीच हरकत नाही.

प्राची म्हणाली, ‘तुम्हाला माहिती आहे, मी पडद्यावर इतक्या वेळा लग्न केलं आहे की, मला वाटतं की, मी आता खऱ्या लग्नात रस राहिला नाही.  जेव्हा माझे मित्र मला सांगतात की, त्यांचे पालक त्यांना लग्नाबाबत फोर्स करतात  तेव्हा मला ते थोडं विचित्र वाटते कारण माझे पालक असे कधीच करत नाहीत. यापूढे ती म्हणाली, ‘जो माणूस माझ्यासाठी आहे, त्याने तयार राहावे की मी माझ्या स्वतःच्या अटींवर जगते आणि मला काय बोलायचं स्वातंत्र्य खूप आवडतं.’[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *